Who Was K Armstrong Esakal
देश

K Armstrong: कोण होते तामिळनाडू बसपा प्रमुख आर्मस्ट्राँग? ज्यांची भररस्त्यात झाली हत्या

आशुतोष मसगौंडे

बहुजन समाज पार्टी तामिळनाडूचे अध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची शुक्रवारी चेन्नईच्या पेरांबूर भागातील त्यांच्या निवासस्थानाजवळ सहा अज्ञात लोकांनी कथितरित्या हत्या केली.

समोर आलेल्या माहितीनुसार, असा दावा करण्यात येत आहे की, बाईकवरून आलेल्या एका अज्ञात गटाने आर्मस्ट्राँग यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येमागील हेतू सध्या अस्पष्ट आहे. आर्मस्ट्राँग यांची हत्या केल्यानंतर खुनातील आरोपी घटनास्थळावरून पळून जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या प्रकरणी तामिळनाडू पोलिसांनी किमान आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक त्यांचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांच्या हत्येची CBI चौकशी करण्याच्या मागणीसाठी राजीव गांधी सरकारी रुग्णालयाबाहेर निदर्शने करत आहेत. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना रुग्णालयाच्या आवारात प्रवेश करण्यापासून रोखले आहे.

कोण होते आर्मस्ट्राँग?

के. आर्मस्ट्राँग यांनी वेंकटेश्वर विद्यापीठ, तिरुपती येथून कायद्याची पदवी घेतल्यानंतर काही वर्षे चेन्नई न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिस केली. आर्मस्ट्राँग यांनी 2006 मध्ये नगरपालिकेची निवडणूक जिंकली आणि त्याच वर्षी त्यांना तामिळनाडू बसपचे प्रमुख बनवण्यात आले.

2011 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत आर्मस्ट्राँग यांनी कोलाथूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे.

आर्मस्ट्राँग दलित आणि वंचितांचे अनेक प्रश्न कायम मांडत असायचे. चेन्नईत बसपाचा जनाधार काही खास नसला तरी, के आर्मस्ट्राँग हे दलित वर्गीय राजकारणातील नावाजलेले नाव होते.

पोलीस काय म्हणाले?

बसपा प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांच्या हत्येबाबत पोलिस म्हणाले की, ही हत्या बदलापोटी करण्यात आली आहे. बसप प्रदेशाध्यक्षाची हत्या ही सूडबुद्धीने केलेली हत्या असू शकते.

गेल्या वर्षी गुंड अर्कोट सुरेशच्या हत्येशी संबंधित हे प्रकरण असू शकते. पोलिसांच्या तपासाचा रोख सुरेश खून प्रकरणाशीही जोडला जात आहे.

चेन्नई पोलिसांनी सांगितले की, तामिळनाडू बसपा अध्यक्ष आर्मस्ट्राँग यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (उत्तर) आयपीएस आसरा गर्ग यांच्या नेतृत्वाखाली 10 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'प्रकाश आंबेडकरांची राज्यात एखादी तरी जागा निवडून आली असती, तर आम्ही त्याची दखल घेतली असती' - शरद पवार

Mumbai Crime: CSMT स्टेशन येथे सामूहिक बलात्कार झालेली 29 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरु

Latest Marathi News Live Updates : राहुल गांधी कोल्हापूरमध्ये दाखल

Morning Routine: दिवसभर स्ट्रेस फ्री राहण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर करा 'या' गोष्टी, दिवसभर राहाल उत्साही

Bigg Boss 18 House: मातीच्या वस्तू अन् दगडाच्या खुर्च्या; कसं आहे सलमानच्या बिग बॉस १८ चं घर? पाहा inside video

SCROLL FOR NEXT