Kalasa-Banduri Scheme Karnataka government esakal
देश

Kalasa-Banduri Scheme : तब्बल 26.96 हेक्टर वनजमीन हस्तांतराचा प्रस्ताव फेटाळला; कर्नाटकाला मोठा दणका

कळसा-भांडुरा योजनेच्या सुधारित आराखड्याला केंद्रीय जल आयोगाकडून मंजुरी दिली होती.

सकाळ डिजिटल टीम

कळसा-भांडुरा योजना ही खानापूर, बैलहोंगल, सौंदत्ती व रामदुर्ग या चार तालुक्यांची जीवदायिनी आहे. कळसा भांडुरा प्रकल्प झाला, तर पाण्याचा प्रश्‍न निकालात निघणार आहे.

बंगळूर/बेळगाव : खानापूर तालुक्यातील कळसा-भांडुरा योजनेसाठी (Kalasa-Banduri Scheme) २६.९६ हेक्टर वनजमीन (Forest land) हस्तांतरित करण्याचा कर्नाटकाचा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणकडून फेटाळण्यात आला आहे. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मधील कलम ३८ अन्वये प्राधिकरणकडून हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

केंद्रीय वन व पर्यावरण खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणच्या स्थायी समितीची ७७ वी बैठक नुकतीच झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कळसा-भांडुरा योजनेचे काम पुन्हा सुरू करण्याच्या कर्नाटक सरकारच्या (Government of Karnataka) प्रयत्नांना पुन्हा खीळ बसणार आहे. दरम्यान, कळसा भांडुरा योजनेसाठी वनजमीन हस्तांतरणाला मंजुरी मिळावी, त्याला केंद्रीय वन खात्याकडून मंजुरी मिळावी, यासाठी कर्नाटकाकडून पुन्हा पाठपुरावा सुरू झाला आहे.

राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी यासंदर्भात केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंग शेखावत व भूपेंद्र यादव यांची दिल्ली येथे भेट घेतली आहे. भूपेंद्र यादव हे केंद्रीय पर्यावरण व वन खात्याचे मंत्री आहेत. वनजमीन हस्तांतरण व ना-हरकत देण्याचा विषय त्यांच्या अखत्यारीत येतो. त्यामुळेच कडाडी यांनी त्यांची भेट घेतली आहे. जलशक्ती खात्याचे मंत्री शेखावत यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही हीच मागणी करण्यात आली आहे.

२०२२ साली बेळगावात विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना कळसा-भांडुरा योजनेच्या सुधारित आराखड्याला केंद्रीय जल आयोगाकडून मंजुरी दिली होती. ती मंजुरी मिळवून देण्यात मंत्री शेखावत यांचा मोठा वाटा होता. पण जलआयोगाकडून मंजुरी देताना केंद्रीय वन, पर्यावरण व जैवविविधता खात्याची ना-हरकत घेण्याची अट घालण्यात आली आहे. या खात्याकडून कळसा-भांडुरा प्रकल्पाला अद्याप ना-हरकत मिळालेली नाही. त्यामुळे आता पुन्हा पाठपुरावा सुरू केला आहे. शिवाय वनजमीन हस्तांतरणाचा कर्नाटक सरकारचा प्रस्तावही फेटाळण्यात आला आहे.

कळसा-भांडुरा योजना ही खानापूर, बैलहोंगल, सौंदत्ती व रामदुर्ग या चार तालुक्यांची जीवदायिनी आहे. कळसा भांडुरा प्रकल्प झाला, तर या चार तालुक्यातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न निकालात निघणार आहे. त्यामुळेच तातडीने ना-हरकत दिली जावी, अशी मागणी कडाडी यांनी केली आहे.

गोव्याची भूमिका काय असणार?

या प्रकल्पाला ना-हरकत देण्यास गोव्याचा विरोध आहे. या विरोधामुळेच प्रकल्पाचे काम थांबले आहे. कर्नाटक सरकार व कर्नाटकच्या सर्वपक्षीय खासदारांकडून या प्रकल्पासाठी नव्याने पाठपुरावा सुरू झाला आहे. त्यामुळे आता गोव्याची भूमिका काय असेल? याबाबतही उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT