चेन्नई : दक्षिणात्या चित्रपटातील सुपरस्टार आणि नेते कमल हसन यांच्या मक्कल निधि मय्यम (एमएनएम) पक्षाची वेबसाइट हॅक झाली आहे. पक्षाच्या वतीने शुक्रवारी ही माहिती देण्यात आली. हॅक झाल्यानंतर काही वेळाने एमएनआयने ट्विटवर याबाबत घोषणा केली. काही उपद्रवी लोकांनी वेबसाईट हॅक केल्याचं सांगण्यात येत आहे. पण पक्ष अशा कृतीला घाबरणार नसून आम्ही सडेतोड उत्तर देऊ, असंही एमएमएमच्या वतीने सांगण्यात आले. Kamal Haasan news in Marathi
एमएनएम पक्षाच्या वेबसाईटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. ज्यामध्ये पक्ष ३० जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये विलीन होणार असं सांगण्यात आलं होतं. या घोषणेमुळे कार्यकर्त्यांना धक्का बसला होता. वेबसाईटवरून ही घोषणा हटविण्यात आली आहे. तसेच पक्ष विलीन करण्याबाबतचा असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच हे हॅकरकडून करण्यात आलेलं कृत्य असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं.
इरोड पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत एमएनएमने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.