kamalnath nakulnath not leavening congress 
देश

Kamalnath Joining BJP : गैरसमज नसावा! कमलनाथांच्या भाजप प्रवेशाच्या मुद्द्यावर काँग्रेसची सारवासारव; म्हणे, मतभेद...

Madhya Pradesh Politics News : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुल नाथ यांच्याबाबत मागील काही दिवसांपासून बऱ्याच चर्चा सुरू आहेत.

रोहित कणसे

Madhya Pradesh Politics News : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुल नाथ यांच्याबाबत मागील काही दिवसांपासून बऱ्याच चर्चा सुरू आहेत. या दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. कमलनाथ यांच्या निवासस्थानी खासदार सज्जन वर्मा यांच्यासह काही नेत्यांची तब्बल दोन तास बैठक झाली. या बैठकीनंतर कमलनाथ काँग्रेस सोडत नसल्याचे सज्जन वर्मा यांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, कमलनाथ यांनी स्वत: बैठकीत याबद्दल माहिती दिली आहे. (kamalnath Nakulnath not leavening congress said MP sajjan singh Congress Madhya Pradesh politics)

सज्जन वर्मा यांनी सांगितलं की, कमलनाथ यांनी बैठकीत स्पष्टपणे सांगितले की, ते कालही काँग्रेसी होते, आजही काँग्रेसी आहेत आणि ते कायम काँग्रेसमध्येच राहतील. काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद नक्कीच होते पण वैयक्तिक मनभेद नाहीत. आता सर्व काही सुरळीत झाले असून ते काँग्रेसशिवाय कुठेही जाणार नाहीत. यावेळी नकुल नाथ यांच्याबाबत होत असलेल्या चर्चांवर देखील त्यांनी वक्तव्य केलं. ते म्हणाले की, वडिलच जाणार नाहीत, तर मुलगा तरी काँग्रेस सोडून कुठे जाणार.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, काँग्रेससोबत ४० वर्षे घालवलेली व्यक्ती अशी पक्ष सोडू शकत नाही. ते लवकरच भोपाळला जाऊन लोकसभेची तयारी करणार आहेत. नुकलनाथही कुठेही जाणार नाहीत, छिंदवाडामधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. सज्जन वर्मा म्हणाले की कमलनाथ यांनी मीडियाशी बोलणार नसल्याचे सांगितले आहे, म्हणाले, मी अफवेला उत्तर द्यायला जाणार नाही, ही अफवा कोठून उभी आहे हे मला माहीत नाही.

कमलनाथ यांच्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांमुळे मध्यप्रदेशमध्ये सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. रविवारीही दिवसभर कमलनाथ यांच्याबाबत सस्पेन्स कायम होता. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि कमलनाथ यांच्यातही चर्चा झाली.

कमलनाथ यांनी काँग्रेसमध्येच राहावे, मुलगा नकुल यांनी भाजपमध्ये जावे, ज्याने काँग्रेसला ट्विटर बायोमधून हटवले ते काँग्रेसला मान्य नाही, असे काँग्रेस पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, कमलनाथ यांना भाजपमध्ये जाऊ दिले जावे असे काँग्रेसला वाटत नाही, यामुळे खराब संदेश जाईल.

काँग्रेसला जाणीव आहे की, गांधी कुटुंबासोबतचे नाते पाहाता दिग्गज नेते कमलनाथ सोडून गेल्याने नुकसान होईल. म्हणूनच दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर कमलनाथ यांची नाराजी दूर करत राहुल गांधी आणि कमलनाथ यांची बोलणी देखील करून दिली.

काँग्रेसने कमलनाथ यांना स्पष्ट संदेश दिला आहे की, वडील काँग्रेसमध्ये राहतील आणि मुलगा त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये राहतील, असे होऊ शकत नाही. भाजपने कमलनाथ कुटुंबाबाबत 'ऑपरेशन लोटस' चालवत नसल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT