Kanchenjunga Express Accident esakal
देश

Kanchanjunga Express Accident: कांचनजंगा एक्स्प्रेसचे डबे उडाले, मालगाडीची मागून धडक! भीषण अपघात कसा घडला? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

Kanchanjungha Express hit by goods train in West Bengal’s New Jalpaiguri: कटिहार विभागातील रंगपानी आणि निजबारी स्थानकादरम्यान स्टेशनवर उभ्या असलेल्या कांचनजंगा एक्सप्रेसला मागून येणाऱ्या मालगाडीने धडक दिली. कांचनजंगा एक्स्प्रेसच्या सुमारे तीन बोगी रुळावरून घसरल्या. धक्का इतका जोरदार होता की एक बोगी दुसऱ्या बोगीवर चढली.

Sandip Kapde

Kanchanjunga Express Accident: पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडीजवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. या अपघातात कांचनजंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कांचनजगा एक्स्प्रेसचा एक डबा मालगाडीला धडकताना आकाशाकडे गेला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गाड्या एकाच रुळावर आल्या होत्या, त्यामुळे हा अपघात झाला. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेवर ट्विट केले असून घटनास्थळी बचाव पथक पाठवण्यात येत असल्याचे सांगितले आहे. मालगाडीने सिग्नल तोडून कांचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.

कटिहार विभागातील रंगपानी आणि निजबारी स्थानकादरम्यान स्टेशनवर उभ्या असलेल्या कांचनजंगा एक्सप्रेसला मागून येणाऱ्या मालगाडीने धडक दिली. कांचनजंगा एक्स्प्रेसच्या सुमारे तीन बोगी रुळावरून घसरल्या. धक्का इतका जोरदार होता की एक बोगी दुसऱ्या बोगीवर चढली. या घटनेची माहिती मिळताच कटिहार रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे. कटिहार आणि एनजेपी येथून अपघातग्रस्त रिलीफ ट्रेन आणि मेडिकल व्हॅनसह रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेत 200 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर पाच लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.  

रंगा पाणी आणि निजबारी स्थानकादरम्यान हा अपघात झाला. ट्रेन नुकतीच न्यू जलपाईगुडीहून निघाली होती आणि किशनगंज मार्गे सियालदहला जात होती. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी एक टीम पाठवली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील दखल घेतली आहे.

एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितले की, तो ट्रेनमध्ये बसला होता तेव्हा मागून जोरदार धक्का बसला. त्यांना काही समजताच प्रवाशांची इकडे-तिकडे धावपळ सुरू झाली. सर्वत्र जोरदार किंकाळ्या आणि आवाज ऐकू येत होते. तोही ट्रेनमधून खाली उतरला आणि धावत सुटला.

कांचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनचा एक प्रवासी म्हणतो, "मी B1 डब्यात प्रवास करत होतो तेव्हा ट्रेनला धडक बसली. मी स्वत:ला वाचवले. माझ्या डोक्याला दुखापत झाली आहे."

सोमवारी सकाळी ही ट्रेन आपल्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे अर्धा तास उशिराने न्यू जलपाईगुडीहून निघाली आणि रंगपाणी ओलांडली. पण, निजबारी स्थानकात पोहोचताना या गाडीला मालगाडीने धडक दिली. डीएम, एसपी आणि बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. दोन स्लीपर कोचचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

कांचनजंगा एक्सप्रेस दुर्घटनेतील पीडितांना मदत पोहोचण्यास थोडा विलंब होत आहे. याचे कारण तेथे पाऊस पडत असून बचाव कार्याला थोडा वेळ लागू शकतो.

"अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 20-25 जखमी झाले आहेत. परिस्थिती गंभीर आहे. मालगाडी कांचनजंगा एक्स्प्रेसला धडकल्याने ही घटना घडली," असे दार्जिलिंग पोलिसांचे अतिरिक्त एसपी अभिषेक रॉय यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT