BJP press note: हिमाचल प्रदेश राज्यातल्या मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार कंगना रणौत यांनी नुकतंच एका मुलाखतीमध्ये शेतकरी आंदोलनाशी संबंधाने भाष्य केलं आहे. जर आमचं शीर्षस्थ नेतृत्व मजबुत नसतं तर शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबलाही बांगलादेश बनवलं असतं, असं कंगना म्हणाल्या.
शेतकरी आंदोलनावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करताना कंगना म्हणाल्या की, आंदोलनाच्या नावावर काही उपद्रवी लोक हिंसा पसरवत होते.. आंदोलनस्थळी बलात्कार आणि खून होत होते. कंपनांच्या या विधानामुळे विरोधी पक्षाने हल्ला चढवला आहे.
कगना रणौत यांच्यावर NSA अंतर्गत कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तर भाजपनेही कंगनाच्या या विधानावरुन पक्षाचा बचाव करत ते त्यांचं वैयक्तिक विधान असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या विधानाचा आणि पक्षाचा काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण भाजपने दिलं आहे.
भाजपने काढलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटलय की, कंगना रणौत यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजप पक्षाशी संबंध नाही. कंगना यांनी व्यक्त केलेले मत हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. पक्ष त्यांच्या मताशी सहमत नाही. पक्षाच्या वतीने पक्षाच्या धोरणांविषयी बोलण्यासाठी कंगणा यांना परवानगी नसून त्यांची त्यासाठी नियुक्तीही नाही.
कंगना यांनी भविष्यात अशा प्रकारची विधानं करु नयेत. भाजप पक्ष हा 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' तसेच सामाजिक मूल्यांवर चालणारा पक्ष असल्याचं भाजपने प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.