Kangana Ranaut esakal
देश

Kangana Ranaut: खासदार होताच कंगनाची मोठी मागणी! CM शिंदेंची मागितली खोली, ठाकरे गटाचा नकार?

Sandip Kapde

Kangana Ranaut:

अभिनेत्री आणि नवनिर्वाचीत खासदार कंगना राणावतने महाराष्ट्र सदनाकडे एक अजब मागणी केली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सूट (प्रशस्त खोली) मागितला आहे. रूम छोट्या असल्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांची रूम मिळावी, अशी मागणी कंगनाने केली आहे. महाराष्ट्र सदनातून कंगनाने महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला फोन केल्याची सुत्रांची माहिती आहे, साम टिव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे.

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्यूट दिला जाणार नाही, असे महाराष्ट्र सदनाने स्पष्ट केले आहे. कंगना म्हणाली, "महाराष्ट्र सदन सर्वात सुंदर आहे. माझे काही मित्र इथे आहेत. महाराष्ट्र माझं घर आहे."

दरम्यान, कंगनाच्या या मागणीवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. "श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी. हिमाचल भवन येथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजीना मिळत असेल तर काहीच हरकत नाही. महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत राहत आहेत श्रीमतीजी," असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

कंगनाच्या या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काहींनी तिच्या मागणीचे समर्थन केले तर काहींनी ती मागणी अवास्तव असल्याचे म्हटले. महाराष्ट्र सदनाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास केला असून त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही व्यक्तीस मुख्यमंत्री स्यूट देणे शक्य नाही.

कंगना राणावत या बॉलिवूड अभिनेत्री असून तिच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. तीच्या मागणीने पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. अभिनेत्री कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणुकीत विजयी झाली आहे. भाजपकडून निवडणूक जिंकून ही अभिनेत्री खासदार झाली आहे. लोकसभा निवडणूक 2024 जिंकून खासदार बनलेल्या नेत्यांनी आज संसद भवनात शपथ घेतली. कंगना राणातनेही शपथ घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Sexual Assault Case: पुणे पुन्हा हादरले! घरात घुसून नराधमाने केला महिलेवर अत्याचार

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

Whatsapp Username Feature : मोबाईल नंबर नसतानाही व्हॉट्सॲपवर करता येणार चॅटिंग; काय आहे युजरनेमचं भन्नाट फीचर?

Mumbai Local: नवीन वेळा पत्रामुळे रेल्वे प्रवाशांची दाणादाण!

Bigg Boss Marathi 5 : "हा अन्याय आहे..." व्होटिंग ट्रेंडमध्ये धक्कादायक बदल ; प्रेक्षकांचा मेकर्सवर घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT