अशा धमक्यांना मी घाबरत नसल्याचं किरोडीलाल मीना यांनी स्पष्ट केलंय.
जयपूर : उदयपूरमध्ये निर्दयी हत्येचा बळी ठरलेल्या कन्हैयालालच्या (Kanhaiyalal Murder Case) कुटुंबाला एक महिन्याचा पगार देण्याची घोषणा करणारे भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार किरोडीलाल मीना (Kirodilal Meena) यांना धमकीचं पत्र मिळालंय. पत्रामध्ये कन्हैयालालनंतर पुढचा नंबर तुमचा असेल, अशी धमकी देण्यात आलीय.
हे पत्र मिळाल्यानंतर खासदार किरोडीलाल मीना यांनी सांगितलं की, 'कादिर अली नावाच्या जिहादीला माझी घोषणा आवडली नाही, त्यामुळं त्यानं मला जीवे मारण्याची धमकी दिलीय. या कारवाईसाठी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय.'
खासदार मीना यांना जीवे मारण्याची धमकी देणारं हे पत्र त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सापडलंय. पत्रातून धमकी देणाऱ्या व्यक्तीनं वृत्तपत्राची कात्रणही (बातमी) पाठवलीय. अशा धमक्यांना मी घाबरत नसल्याचं किरोडीलाल मीना यांनी स्पष्ट केलंय. मी यापुढंही जनतेचा आवाज बुलंद करत राहीन. जिहादी आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या राजकीय शक्तींचा मी पर्दाफाश करत राहीन, जरी माझा जीव गेला तरी, असंही त्यांनी प्रत्युत्तर दिलंय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.