Kannada Association Marathi Board esakal
देश

Belgaum : अधिवेशनाच्या तोंडावरच कन्नड संघटनांनी फाडले इंग्रजी-मराठी फलक; नेत्यांचं लक्ष वेधण्यासाठी कन्नडिगांची वळवळ सुरू

हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर कन्नड संघटनांची (Kannada Association) आगळीक सुरू झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

बेळगावसह सीमाभागात मराठीभाषिक मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळेच हा भाग महाराष्ट्राला जोडावा, अशी मागणी आहे.

बेळगाव : हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर कन्नड संघटनांची (Kannada Association) आगळीक सुरू झाली आहे. कन्नड सक्तीचा अट्टहास धरत इंग्रजी पाट्या आणि मराठी फलक (Marathi Board) फाडत शांत बेळगाव शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे कायदा हाती घेणाऱ्या व शहराला वेठीस धरणाऱ्या स्वयंघोषित संघटनांच्या कार्यकर्त्यांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

विधिमंडळ अधिवेशनासाठी मुख्यमंत्री, मंत्र्यांसह महत्त्वाचे नेते बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी नेहमीप्रमाणे स्वयंघोषित कन्नड संघटनांची वळवळ सुरू झाली आहे. विविध ठिकाणी फलक फाडून निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला जात आहे. चन्नम्मा चौकात पोलिसांवर शाई फेकली, जाहिरातींचे बॅनरही फाडले; तरी त्यांनी बघ्याची भूमिका घेतली.

बेळगावसह सीमाभागात मराठीभाषिक मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळेच हा भाग महाराष्ट्राला जोडावा, अशी मागणी आहे. केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाने बेळगावला कन्नडसह मराठीमधून प्रशासकीय कामकाज चालवा, अशा सूचना केल्या आहेत. तरीही प्रशासकीय पातळीवर कन्नड भाषेचा अट्टहास सुरू आहे. त्यात कन्नड संघटनांची भर पडत आहे. शहरातील राणी चन्नम्मा चौकात अचानक आंदोलन करून फलकांना लक्ष्य केल्याने काहीकाळ गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली.

पोलिसांनी अशा संघटनांवर बंदी घालावी आणि दडपशाही निर्माण करणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. मराठी भाषिकांना आपल्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन किंवा मोर्चा काढण्यास मज्जाव केला जातो. गंभीर गुन्हे दाखल केले जातात. मात्र, आजच्या घटनेने कन्नड संघटनांना पोलिसांनी व जिल्हा प्रशासनाने सोयीस्कर मोकळीक दिल्याचा अनुभव आला.

शहराला धरले वेठीस

फलकांसाठी झालेल्या आंदोलनावरून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांच्या हातातील शाईची बाटली पोलिसांनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असताना शाई पोलिसांच्याही गणवेशावर पडली. पोलिसांनी आंदोलकांना अडविल्याबद्दल निषेध करत कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून निदर्शने केली.

आंदोलनात चर्चा महामेळाव्याची

फलकांसाठी आंदोलन करत असताना म. ए. समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारली जावी, अशी अजब मागणी करण्यात आली. विधिमंडळ अधिवेशन ४ डिसेंबरला होत आहे. त्याच दिवशी महामेळावा होणार आहे. फलकांसाठी आंदोलन झाले असले तरी, चर्चा महामेळाव्याची दिसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT