national News Kapil sibbal PNB Bank Scam 
देश

कपिल सिब्बल यांच्या डिनर पार्टीत भाजपाला सत्तेबाहेर करण्याची खलबतं

देशातील दिग्गज नेते सिब्बल यांच्या निवासस्थानी झालेल्या डिनर कार्यक्रमाला उपस्थित होते.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री भोजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या भोजन समारंभाच्या (dinner party) निमित्ताने अनेक नेते एकत्र जमले होते. यावेळी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत (Loksabha election) भाजपाला (Bjp) पुन्हा सत्ता मिळवण्यापासून रोखणं आणि काँग्रेस पक्षाचं पुनरुज्जीवन या दोन प्रमुख मुद्यांवर चर्चा झाली.

वेगवेगळ्या पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र जमले होते. विरोधकांची एकजूट भक्कम करणं तसचं पुढच्यावर्षी होणारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आणि २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. कपिल सिब्बल यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्या निमित्ताने या डिनर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या निमित्ताने नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधकांची आघाडी भक्कम करण्याबद्दल चर्चा झाली. "एकजूट अधिक भक्कम करण्यासाठी अशा बैठका सातत्याने झाल्या पाहिजेत. भाजपाला सर्वप्रथम २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात त्यानंतर २०२४ लोकसभा निवडणुकीत पराभूत करायचे आहे" असे बैठकीला उपस्थित असलेल्या एका विरोधी पक्षाच्या नेत्याने सांगितले. टाइम्स नाऊने हे वृत्त दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पार्टीकडून अखिलेश यादव, रामगोपाल यादव, सीपीआय-एमकडून सीताराम येचुरी, सीपीआयकडून डी राजा, नॅशनल कॉन्फरन्सकडून ओमर अब्दुल्ला, पी. चिंदबरम असे दिग्गज नेते या डिनर कार्यक्रमाला उपस्थित होते. शिवसेनेकडून संजय राऊतही हजर होते. काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यासाठी मागच्यावर्षी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिणारे 'ग्रुप २३' चे सदस्यही या डिनर कार्यक्रमाला उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT