Kargil Vijay Diwas 2024 sakal
देश

Kargil Vijay Diwas 2024 : छातीत गोळी,डोळ्यासमोर मरण...

सकाळ वृत्तसेवा

‘‘कारगिल युद्धात माझ्या छातीत उजव्या बाजूला गोळी लागली. रक्तस्राव खूप झाल्याने माझा

श्‍वास कमी होऊ लागला. दवाखान्यात नेण्यासाठी मला जीपमध्ये ठेवण्यात आले. त्याचवेळी जीपच्या बोनटवर एक बॅाम्ब येऊन आदळला. चालक गंभीर जखमी झाला. मला तर माझे मरण दिसू लागले होते, मात्र छातीत गोळी अन् हृदयात समाधान होते. आपण देशासाठी कामी येत आहोत याचा सार्थ अभिमान होता. अशातच डॅाक्टरकडे शेवटची इच्छा बोलून दाखवली अन् मी डोळे मिटले. हा थरारक प्रसंग सांगत होते,

- लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, निवृत्त

रगिल युद्धाला आज २५ वर्षे होत आहेत. त्यानिमित्त राजेंद्र निंभोरकर यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले ः कारगिल युद्ध सुरू झाले आणि मे, जूनच्या दरम्यान आपली सगळीकडे पीछेहाट होत होती. कोठेच यश मिळत नव्हते. पाकिस्तानची ताकद कमी करायची असल्यास दुसऱ्या बाजूने त्यांच्यावर हल्ला करावा लागणार होता. त्यावेळी आम्ही पूँछ भागात होतो. २७ जून १९९९ ला सायंकाळी टायगर हिलवरील दबाव कमी करण्यासाठी दुसरीकडून पाकच्या चौकीवर हल्ला करण्याचा आदेश मला मिळाला. त्यावेळी मी कर्नल होतो. माझ्याकडे पाच कंपन्या (सैन्याच्या तुकड्या) होत्या. त्यातील दोन कंपन्यांनी पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या.

मात्र त्यावेळी आमच्या कंपन्यांवर पाक सैन्याने बेछूट गोळीबार केला. आर्टिलरीचे बॅाम्ब आमच्या दिशेने सोडले. १५ ते २० किलोचा शक्तीशाली बॅाम्ब पडल्यावर आपण आवाजाच्या धमाक्याने सुन्न होऊन जातो. याच दरम्यान माझ्या छातीत उजव्या बाजूला एक गोळी लागली अन् रक्ताची चिळकांडी उडाली. कडाक्याच्या थंडीत गोळी लागल्यावर सुरवातीला दुखत नाही. चिळकांडी पाहून मीच म्हणालो, ‘‘अरे किसको गोली लगी है क्या.’’ माझी वर्दी रक्ताने भरलेली दिसल्याने नंतर समजले की मलाच गोळी लागली आहे. माझ्या साथीदार जवानांनी शत्रूचे फायरिंग सुरू असताना जिवाची पर्वा न करता मला एक किलोमीटरपर्यंत उचलून आडोशाला नेले. शिख जवानांनी पगडी सोडून माझ्या छातीला बांधली, पण रक्त काही थांबेना.

डॅाक्टर आले आणि त्यांनी मला तपासले. मी डॅाक्टरांना विचारले, ‘‘मेरे पास अब कितना टाइम है.’’ डॅाक्टर म्हणाले, ‘‘तुम बच जाओगे, तुम्हे कुछ नही होगा.’’ त्यांनी मला धीर दिला. मी डॅाक्टरला म्हटलो, ‘‘तुम्ही हे रक्त थांबवले नाही, तर मी ५-१० मिनिटांपेक्षा जास्त काळ जगू शकणार नाही.’’ मला माझे मरण दिसत असताना कुटुंब डोळ्यासमोर उभे राहिले, पण मला कशाचाच पश्चात्ताप झाला नाही. माझी शेवटची इच्छा पत्नीसाठी सांगताना मी डॅाक्टरला म्हणालो, ‘‘घरी माझ्या दोन मुली आहेत. त्यांना चांगले शिकव. मोठ्या मुलीला डॅाक्टर बनव. सर्वांची काळजी घे.’’ एवढे सांगून मी बेशुद्ध झालो. नंतर मला दिल्लीत आणून माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर लष्कराने निंभोरकर यांना पीस पोस्टिंग दिले होते, मात्र ते त्यांनी नम्रपणे नाकारले. ते पुन्हा त्यांच्या १५ पंजाब रेजिमेंटमध्ये हजर झाले आणि नेहमीप्रमाणे सीमेवर सैन्याचे नेतृत्व करू लागले. निंभोरकर यांची सर्वाधिक सेवा काश्मीर खोऱ्यात झाली आहे. त्यांची मुलगी लष्करात डॅाक्टर आहे. जावई नौदलात, तर भाऊ हवाई दलात ग्रुप कॅप्टन आहे.

गोळी लागलेले हेल्मेट संग्रहालयात

राजेंद्र निंभोरकर म्हणाले, कारगिल युद्धात मी बटालियन कमांडर (कर्नल) होतो. युद्धात आमच्या एका जवानाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. जवानाला सुरक्षित ठिकाणी नेऊन त्याच्यावर उपचार करणे गरजेचे होते. मी त्या जवानाला खांद्यावर घेऊन पळत सुटलो. आमच्यावर फायरिंग सुरू झाले. पळत असताना एक गोळी हेल्मेटमध्ये घुसली, पण ती आत गेली नाही. हेल्मेटमुळे माझे प्राण वाचले. आज ती हेल्मेट लष्करी संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आली आहे. या कर्तव्यासाठी मला सेना मेडल मिळाले.

कारगिल विजयाबद्दल निंभोरकर म्हणतात, ‘‘कारगिल युद्धात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्याने आपले कर्तव्य बजावले. देशप्रेमाने प्रेरित होऊन आपल्या सैन्याने रक्त गोठविणाऱ्या थंडीत (उणे १५ ते ५० अंश तापमान) अत्यंत निकराचा लढा दिला. समोर मरण दिसत असतानाही भारतीय जवानांनी आत्मघातकी हल्ले केले. म्हणून आपण विजयी झालो. या शौर्याला जगात तोड नाही.’’

(राजेंद्र निंभोरकर यांचे मूळ गाव वडाळा (ता. आष्टी, जि. वर्धा) आहे. परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, उत्तम योद्धा सेवा पदक, सेना पदक, कारगिल गौरव पदक अशी सुमारे २२ पदके त्यांना मिळाली आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT