Kargil Vijay Diwas sakal
देश

Kargil Vijay Diwas : नौदलाचे ‘ऑपरेशन तलवार’

सकाळ वृत्तसेवा

कमोडोर श्रीकांत केसनुर , (निवृत्त)

‘ऑपरेशन तलवार’ ही भारतीय नौदलाचा हेतू आणि क्षमता सिद्ध करणारी मोहीम ठरली. पाकिस्तानी नौदलाचे स्थान ओळखणे, त्यानुसार समुद्रातील आपले स्थान व सामर्थ्य निश्‍चित करणे ही जबाबदारी नौदलाच्या सर्व घटकांवर देण्यात आली होती.

पाकिस्तानला यशाचा दावा करण्याची कोणत्याही संधी मिळू नये यासाठी ही योजना करण्यात आली होती. तसेच, पाकिस्तानने मर्यादित जागेत असलेल्या कारगिल सेक्टरमधून युद्धाचा आणखी विस्तार करण्याचा प्रयत्न केल्यास नौदल दक्षिणेत आणखी एक आघाडी उघडेल हेदेखील सुनिश्चित करण्यात आले होते.

कारगिलचे युद्ध भारताच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. युद्धात लष्कर आणि वायुसेनेच्या योगदानाचे चांगल्या प्रकारे दस्तावेजीकरण केले गेले आहे, परंतु नौदलाचा सहभाग फारसा समोर आला नाही. ‘ऑपरेशन तलवार’मध्ये नौदालाने महत्त्वाची भूमिका बजावली. नौदलाचे कार्य बऱ्याचदा प्रकाशात येत नाही आणि त्यामुळेच अनेक वीर जवान ‘मूक योद्धे’ ठरतात! युद्धात प्रतिरोध कसा करायचा हे राजकीय, राजनैतिक आणि लष्करी माध्यमांच्या सक्रिय संयोजनातून ठरवले जाते. आपल्या राजकीय आणि प्रशासकीय आघाडीवर संबंधित लोक मुत्सद्देगिरी करताना त्यांची भूमिका उत्तमपणे बजावत होते, तर भारतीय सशस्त्र दलांनी सुनियोजित, संयुक्त मोहीम आखून पाकिस्तानला पूर्णतः नामोहरम केले जाईल असा विश्‍वास दिला होता.

पाकिस्तानला रोखण्यात यश

दरम्यान, एलओसी (ताबारेषा) न ओलांडण्याचे निर्बंध पाळत नौदलाने पाकिस्तानला थेट इशारा दिला होता. कोणत्याही प्रकारे युद्ध भडकत गेल्यास त्याचे कठोर परिणाम पाकिस्तानला सहन करावे लागतील असा थेट इशारा देत त्या पद्धतीने नौदलाने आपली स्थिती कायम ठेवली होती. ‘ऑपरेशन तलवार’ भारतीय नौदलाचा हेतू आणि क्षमता सिद्ध करणारी मोहीम ठरली. पाकिस्तानी नौदलाचे स्थान ओळखणे, त्यानुसार समुद्रातील आपले स्थान व सामर्थ्य निश्‍चित करणे ही जबाबदारी नौदलाच्या सर्व घटकांवर देण्यात आली होती. पाकिस्तानला यशाचा दावा करण्याची कोणत्याही संधी मिळू नये यासाठी ही योजना करण्यात आली होती. तसेच, पाकिस्तानने मर्यादित जागेत असलेल्या कारगिल सेक्टरमधून युद्धाचा आणखी विस्तार करण्याचा प्रयत्न केल्यास नौदल दक्षिणेत आणखी एक आघाडी उघडेल हेदेखील याद्वारे सुनिश्चित करण्यात आले होते. या मोहिमेत अरबी समुद्रात लढाऊ जहाजांची प्रचंड मोठी संख्या दिसून आली. पूर्वेकडील जहाजांच्या मदतीने पश्‍चिमेकडील जहाजांची ताकद वाढवण्यात आली.

उत्तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणावर तैनात असलेल्या भारतीय सैन्यामुळे आपल्यासाठी आवश्‍यक ठरणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा खंडित होऊ शकतो, हा धोका पाकिस्तानने ओळखला. भारतीय नौदलाकडून बंदरावर होऊ शकणाऱ्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानला आपले नौदल कराचीमधून हलवावे लागले. यामुळे लष्कर आणि हवाई दलाला वेळ मिळाला. नौदलाने इतरही अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. नौदलाची विमाने लष्कराच्या मदतीसाठी ‘एलओसी’वर कार्यरत होती. नौदलाचे जवान युद्धात इतर दलांच्या बरोबरीने लढत होते. पाकिस्तानात क्षेपणास्त्रासाठी आवश्‍यक असलेले घटक घेऊन जाणारे उत्तर कोरियाचे जहाज नौदलाने अडवले आणि त्यावरील घुसखोरांना अटकही केली.

यावरून पाकिस्तानला सतत चिंतेत आणि धोक्याच्या स्थितीत ठेवून, तसेच ते अडचणीत येतील अशा प्रकारची कृती करण्यास त्यांना भाग पाडून आणि वेळप्रसंगी उर्वरित दोन्ही दलांची मदत करून नौदलाने या युद्धात अत्यंत मोलाची भूमिका बजावली, वायूसेना आणि लष्कराला वेळोवेळी मदत करण्यासाठी, समुद्रात निर्माण होऊ शकणाऱ्या युद्धाबाबत योग्य ती काळजी घेऊन प्रसंगी सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी नौदलाने घेतलेली भूमिका अभ्यासण्यासारखी आहे. संघर्ष स्थानिक पातळीवर सुरू ठेवला आणि पाकिस्तानच्या ऊर्जापुरवठ्याची आणि अर्थव्यवस्थेची कोंडी करण्याचा इशारा दिला. त्यामुळे हे युद्ध भारतासाठी अनुकूल असलेल्या अटींवर येऊन थांबले. डोंगराळ प्रदेशात लढूनही नौदलाने आपली उपयुक्तता अनेक प्रकारे सिद्ध केली. आज प्रगत तंत्रज्ञान आणि त्यातही बहुतांश गोष्टी स्वदेशी असल्याने नौदल अधिक सामर्थ्यशाली झाले आहे. नौदलाचे प्रशिक्षण आणि मोहिमेसाठी तयार होण्याचा त्यांचा पवित्रा पाहिल्यावर युद्ध कसेही असले, तरी शत्रूला सडेतोड प्रत्युत्तर देण्यास आपण सक्षम आहोत असा विश्‍वास आपल्याला जाणवतो, हे नक्की!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT