Kargil Vijay Diwas sakal
देश

Kargil Vijay Diwas : पाकिस्तानला ‘जोर का झटका’

सकाळ वृत्तसेवा

कर्नल दीपक रामपाल, निवृत्त

वीरचक्र पुरस्काराने सन्मानित

भारतीय लष्कराने हवाई दल आणि नौदलाच्या समर्थ साथीने पाकिस्तानी घुसखोरांना जोरदार झटका दिला आणि त्यांना भारतीय हद्दीतून यशस्वीपणे बाहेर काढले. या यशस्वी मोहिमेत ५०० हून अधिक सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आणि १३००हून अधिक सैनिक या युद्धामध्ये गंभीर जखमी झाले.

उत्तरेकडे हिमालय, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम सीमांलगत समुद्र किनारा अशी अनोखी भौगोलिक रचना भारताला लाभली आहे. याबरोबरच पाकिस्तान आणि चीन ही भांडखोर भूमिका घेणारी शेजारी राष्ट्रेही देशाला लागून आहेत. जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी सैन्याने १९९९मध्ये लेह, लडाखचा भाग असलेल्या हिमालयीन परिसरातील कारगिल क्षेत्रावर गुप्त हल्ला करण्याचे ठरवले. लडाखला काश्मीरपासून वेगळे करणे आणि मागील काही युद्धांमध्ये झालेल्या पराभवांचा बदला घेणे हा त्यामागील हेतू होता. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यात १९९८मध्ये झालेल्या लाहोरच्या कराराचे हे उल्लंघन होते. प्रदेशात शांतता टिकवण्यासाठी आणि वाढते शत्रुत्व रोखण्यासाठी हा करार करण्यात आला होता.

कारगिलचा प्रदेश ‘झोजी ला पास’ येथूल सुरू होतो आणि श्रीनगर-झोजी ला-ड्राझ-कारगिल-लेह यांना जोडणारा हा एकच रस्ता आहे. या रस्त्याच्या उत्तरेला मोठमोठे पर्वत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर काही अडथळे निर्माण झाल्यास श्रीनगरपासून लेहपर्यंतच्या भागांचा संपर्क तुटू शकतो. ड्राझ-कारगिल-बटालिक प्रदेशातील पर्वतांची उंची १५ हजार फुटांपासून १८ हजार फुटांपेक्षाही अधिक आहे. ही शिखरे भारताच्या बाजूने, म्हणजे दक्षिणेकडे बर्फाच्छादित, टोकदार आणि खडकाळ आहेत. तर उत्तरेकडे म्हणजे पाकिस्तानच्या बाजूने काहीशी पायऱ्यांसारखी उतरती आहेत. येथे एकही झुडूप किंवा गवताचे साधे पानही उगवत नाही. या पर्वतांवर चालताना एक पाऊल जरी चुकीचे पडले, तरी तुम्ही थेट घाटातून वेगाने वाहणाऱ्या नाल्यात पडाल. या भागातील वस्ती रस्त्यालगतच्या परिसरात असून विरळ आहे. उन्हाळ्यात फक्त मेंढपाळ त्यांच्या शेळ्या, मेंढ्या चरायला या भागात घेऊन जातात. अंगावर येणारे डोंगर, ज्यात झाडे नाहीत किंवा वस्ती नाही, जलमार्ग म्हणून वाहणारे नाले, वर पिण्यासाठी पाणी नाही आणि पूर्णपणे निर्जन असा होता कारगिल प्रदेश. भारतीय लष्कराने लाहोर कराराचा निर्णय मान्य केला होता आणि १९९८मध्ये पाकिस्तानी सैन्याने जोरदार तोफगोळ्यांचा मारा करूनही भारतीय सैन्याने या क्षेत्रातील आपली शक्ती आणि संसाधने वाढवली नाहीत. त्यामुळे नियंत्रण रेषेजवळ सैन्याची तैनात तुरळक होती आणि पाळत ठेवणेही मर्यादित होते.

तत्कालीन पाकिस्तानी सैन्यप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी त्यांच्या सैन्याला भारतीय प्रदेशात एक गुप्त मोहीम राबविण्यास सांगितली आणि श्रीनगर-कारगिल-लेह महामार्गावरच्या शिखरांवर ताबा मिळवण्याचे आदेश दिले. एसएसजी आणि नॉर्थन लाइट इन्फंट्रीच्या जवानांनी दहशतवाद्यांचा वेश परिधान करून, भारतीय हद्दीत घुसखोरी केली आणि ड्राझ-कारगिल-बटालिक-तुर्तुक प्रदेशात शिखरांवर कब्जा केला.

सुरुवातीच्या टप्प्यात पाकिस्तानी सैनिकांनी सुरक्षित जागा तयार केल्या, दारूगोळा आणि अन्नसामग्री आणली. इथे विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे डोंगराच्या माथ्यावर बसणे कोणत्याही सैन्याला फायद्याचे असते. खालून हल्ला करणाऱ्या शत्रूचा प्रतिकार करणे त्यांना सोपे जाते. सामान्य सपाट प्रदेशात आक्रमण करणाऱ्यांचे प्रमाण १ (रक्षक) : ३ (हल्लाखोर) असे आहे तर अशा उंच, खडबडीत डोंगराच्या पृष्ठभागावर हेच प्रमाण १:१२ पर्यंत वाढते.

पाकिस्तानी सैन्याला या क्षेत्रातून हाकलण्यासाठी अनेक प्रयत्न केले. यातूनच ‘ऑपरेशन विजय’ सुरू करण्यात आले. भारतीय लष्कराने हवाई दल आणि नौदलाच्या समर्थ साथीने पाकिस्तानी घुसखोरांना जोरदार झटका दिला आणि त्यांना भारतीय हद्दीतून यशस्वीपणे बाहेर काढले. या यशस्वी मोहिमेत ५०० हून अधिक सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आणि १३००हून अधिक सैनिक या युद्धामध्ये गंभीर जखमी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT