कर्नाटक विधानसभा निवडणूक लढण्याबाबत आज राष्ट्रवादी निर्णय घेणार आहे.
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकात दहा मे रोजी मतदान, तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 20 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत.
मात्र, आता राष्ट्रवादीनं देखील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलाय. कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर आज राष्ट्रवादीची (NCP) बैठक होणार आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे.
शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत कर्नाटक विधानसभा निवडणूक लढण्याबाबत आज राष्ट्रवादी निर्णय घेणार आहे. पक्षाकडून 50 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे करण्यात येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, राष्ट्रवादीला घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास निवडणूक आयोगानं परवानगी दिल्याचं कळतंय. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवण्याची दाट शक्यता आहे.
निवडणूक आयोगाला (Election Commission) पक्षाकडून विनंती करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर, कर्नाटक निवडणूक कोणत्या चिन्हावर लढणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं. मात्र, निवडणूक आयोगाच्या परवानगीमुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कर्नाटक निवडणुकीसाठी मोठा दिलासा मिळालाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.