बंगळुरु : कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी आज मतदान पार पडलं. यानंतर आता मतदानोत्तर चाचण्याही (एक्झिट पोल्स) जाहीर झाल्या आहेत. सहा एक्झिट पोल्सच्या सर्व्हेनुसार कर्नाटकात काँग्रेस पक्ष बाजी मारणार असल्याचं चित्र आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया, जन की बात, मॅट्रिझ, सी व्होटर, पीएमएआरक्यू, पोलस्ट्रेट या सर्व पोल्समध्ये काँग्रेसला ९० ते १२० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, इथ सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आकडा ११३ आहे. (Karnataka Assembly Election 2023 Exit Polls out see who might be won Karnataka)
भाजपसाठी प्रतिष्ठेची निवडणूक
कर्नाटकची निवडणूक भाजपसाठी अधिक महत्वाची होती. कारण दक्षिण भारतात कर्नाटकच एकमेव राज्य आहे जिथं भाजपची सत्ता आहे. त्यामुळं इथं सत्ता राखणं भाजपसाठी प्रतिष्ठेचं आहे. 'भारत जोडो' यात्रेमुळं काँग्रेसला इथं फायदा होईल असं यापूर्वी सर्व्हेंनी सांगितलं होतं. यासाठी नेहमीप्रमाणं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले होते. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील इथं अनेक सभा घेतल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वतः बेळगावात प्रचारासाठी गेले होते. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी प्रचार केला.
निवडणुकीत कुठले मुद्दे गाजले?
कर्नाटकची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांकडून विविध मुद्दे प्रचारात आणले. यांपैकी अमुल दूध आणि नंदीनी दूध, पंतप्रधान मोदींना खर्गेंनी विषारी साप संबोधलं, कोरोना काळात इम्युनिटी बुस्टर ठरलेली हळद, बजरंग बलीच्या नावानं मतदान, वेगळा कर्नाटक, भ्रष्टाचार तसेच 'द केरळ स्टोरी' असे अनेक मुद्दे कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गाजले.
असे आहेत एक्झिट पोल?
टाइम्स नाऊ - ईटीजी :
भाजप - 78-92
काँग्रेस - 106-120
जेडीएस - 20-26
इतर - 02-04
एशियानेट - जन की बात :
भाजप - 94-117
काँग्रेस - 91-106
जेडीएस - 14-24
इतर - 0-2
झी न्यूज - मॅट्रिझ :
भाजप - 79-94
काँग्रेस - 103-118
जेडीएस - 25-33
इतर - 2-5
एबीपी न्यूज - सी व्होटर :
भाजप - 66-86
काँग्रेस - 81-101
जेडीएस - 20-27
इतर - 0-3
टीव्ही९-पोलस्ट्रेट :
भाजप - 88-98
काँग्रेस - 99-109
जेडीएस - 21-26
इतर - 0-4
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.