Karnataka Assembly Election 2023 esakal
देश

Karnataka election : भाजपला धक्क्यावर धक्के; पाचवेळा आमदार झालेल्या नेत्याचा मोठा निर्णय

हलदी श्रीनिवास शेट्टी हे कर्नाटकातील कुंदापुरा (Karnataka Kundapura) येथील आमदार आहेत.

बाळकृष्ण मधाळे

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, तिकीट मिळविण्यासाठी नेते आणि आमदारांमध्ये चुरस पहायला मिळत आहे.

मात्र, अशावेळी पाच वेळा भाजपचे आमदार राहिलेले हलदी श्रीनिवास शेट्टी (Haladi Srinivas Shetty) यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केलीये. यासोबतच त्यांनी आपल्या मतदारांना भाजप (BJP) उमेदवाराला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय.

हलदी श्रीनिवास शेट्टी हे कर्नाटकातील कुंदापुरा (Karnataka Kundapura) येथील आमदार आहेत. त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलंय. पाचवेळा आमदार झालेल्या नेत्यानं भाजप श्रेष्ठींकडं उमेदवारांच्या यादीत आपलं नाव टाकू नये, अशी विनंतीही केलीये.

निवडणूक न लढवण्याची घोषणा करताना शेट्टी म्हणाले, 'मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही आणि हा निर्णय मी स्वेच्छेनं घेतला आहे. पाच वेळा आमदार म्हणून मी माझं काम नेहमीच बांधिलकीनं केलंय आणि सामाजिक न्यायासाठी नेहमीच उभा राहिलो आहे. कुंदापुराच्या जनतेनं प्रत्येक निवडणुकीत मला आशीर्वाद दिला आणि 2013 मध्ये मी अपक्ष म्हणून उभा राहिल्यावरही मला विधानसभेत पाठवलं. जनतेच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा मी सदैव ऋणी राहीन.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT