Karnataka Assembly Election 2023 esakal
देश

Satej Patil : 'मन की बात'वरुन सतेज पाटलांनी मोदींना घेरलं; म्हणाले, पेट्रोल 100 तर सिलिंडर..

सकाळ डिजिटल टीम

मन की बातची जेव्हा पहिली मालिका प्रसारित झाली, तेव्हा पेट्रोलची किंमत प्रति लिटर ५१ रुपये, सिलिंडरची किंमत ४०० रुपये होते.

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप-काँग्रेसकडून जोरदार प्रचार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मन की बात कार्यक्रमांची संख्या वाढल्याप्रमाणं देशात पेट्रोल, सिलिंडर आदी वस्तूंचे दरही वाढत असल्याची टीका काँग्रेस (Congress) आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली. ग्रामीण मतदारसंघातील बेनकनहळ्ळी गावात आयोजित काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रचारसभेला ते संबोधित करत होते.

मन की बातची जेव्हा पहिली मालिका प्रसारित झाली, तेव्हा पेट्रोलची किंमत प्रति लिटर ५१ रुपये, सिलिंडरची किंमत ४०० रुपये होते आणि १०० व्या मालिका पूर्ण झाली त्यावेळी पेट्रोलची किंमत प्रतिलिटर १०० रुपये तर सिलिंडरची किंमत १२०० रुपये झालेली आहे, असं त्यांनी सांगितलं.

हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) म्हणाल्या, गेल्यावेळी निवडणुकीच्या दरम्यान दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करूनच मी आपल्या पुढं उभी आहे. ग्रामीण मतदारसंघात औद्योगिक, उच्च शिक्षण सुरु करण्याचं ध्येय आहे. मात्र, मी विरोधी पक्षात असल्यामुळं ते काम अजून पूर्ण होणं बाकी आहे. त्या मागण्यादेखील पूर्ण करण्यात येईल. यंदा काँग्रेसचीच सत्ता येणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याप्रसंगी माजी मंत्री विश्वजीत कदम, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, मृणाल हेब्बाळकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election: ''काय झाडी.. काय डोंगर... किती हे खोके?'' पुण्यात नाकाबंदीदरम्यान सापडले पाच कोटी

Karad Assembly Election 2024 : कऱ्हाडला सोनू, नकटा रावळ्यासह बुक्कीत टेंगुळवरही रंगताहेत चर्चा

Sarfaraz Khan: सर्फराज खानला पुत्ररत्न! गोड बातमी सोशल मीडियात व्हायरल

Australia दौऱ्यासाठी भारत A संघाची घोषणा, ऋतुराजच्या हाती कर्णधारपदाची धुरा, इर्श्वरनला दिली मोठी संधी

Melie Kerr: लहानपणी ज्यांच्याबरोबर वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न होतं, ज्यावर निबंध लिहिला.... जेव्हा अगदी तसंच घडतं

SCROLL FOR NEXT