Sharanu Salagar  
देश

Sharanu Salagar : भाजप आमदाराचा प्रताप! भगवान श्रीरामांच्या मूर्तीवर पाय देऊन जनतेला केलं अभिवादन

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - रामनवमीच्या दिवशीच प्रभू श्री रामचंद्रांचा अवमान केल्याबद्दल कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाच्या आमदारावर जोरदार टीका होत आहे. बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरणू सलगर भगवान रामाच्या पुतळ्यावर चढून पुष्पहार अर्पण करताना दिसतात.

या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरून भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर टीका करण्यात येत आहे. शरणू सलगर पुतळ्यावर पाय ठेवून फोटो काढताना दिसल्याने अनेक भाविक संतप्त झाले आहेत. काँग्रेसने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत 'हिंदुत्व' आणि प्रभू रामाच्या श्रद्धेबाबत भाजपकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भाजप नेत्यांनी देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत काँग्रेसने इतर अनेक घटनांचा ही उल्लेख केला. दाव्यांप्रमाणे खरच हिंदू धर्मरक्षक आहेत का, असा सवालही काँग्रेसने केला आहे.

दरम्यान कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण हे कृत्य केले असून स्वत:हून तसे करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, अस शरणू सलगर यांनी म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North: काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमधून उमेदवार बदलला, मधुरीमाराजेंना उमेदवारी

Shivsena Candidate List: शिवसेनेची तिसरी यादी जाहीर! १५ जणांच्या नावांचा समावेश, दोन जागा मित्रपक्षांना; शायना एनसी यांना उमेदवारी

Pradip Sharma: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं बंड! शिवसेनेचा आदेश डावलून पत्नीचा अपक्ष अर्ज भरणार

Chetna Pagydyala : १६ वर्षीय चेतनाने मोडला मिताली राजचा विक्रम; १९७३ सालचा पराक्रमही उध्वस्त, संघाचा ऐतिहासिक विजय

Video Viral: ''शिंदेंनी फसवलं, उद्धव ठाकरेच आमच्यासाठी देव'' उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले; अन्नही सोडलं

SCROLL FOR NEXT