Karnataka Child Sale Racket  esakal
देश

Child Sale Racket : तीन वर्षांत तब्बल 250 हून अधिक बालकांची केली विक्री; तपासात धक्कादायक माहिती उघड

कर्नाटकात विकल्या गेलेल्या मुलांची माहिती आरोपींकडून गोळा करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

रॅकेटची म्होरकी महालक्ष्मी ही चार-पाच वर्षांपूर्वी भाड्याच्या घरात राहून काम करत होती.

बंगळूर : बालक विक्री रॅकेटमधील (Child Sale Racket) अटक केलेल्या आरोपींनी आतापर्यंत २५० हून अधिक मुलांची विक्री केल्याची धक्कादायक बाब सीसीबी पोलिसांच्या (CCB Police) तपासात समोर आली आहे. या रॅकेटमधील आरोपींनी कर्नाटकात ५० ते ६० मुलांची विक्री केली, तर उर्वरित मुले तमिळनाडूला विकण्यात आली.

तपासात त्यांनी गेल्या तीन वर्षांत २५० हून अधिक मुलांची विक्री केल्याचे सांगितले. सीसीबी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तीव्र केला असून, कर्नाटकात विकल्या गेलेल्या मुलांची माहिती आरोपींकडून गोळा करत आहेत. आतापर्यंत त्यांच्याकडे १० मुलांची माहिती मिळाली असून, उर्वरित मुले कुठे आणि कोणाला विकली गेली याचा तपास सुरू आहे.

या रॅकेटची म्होरकी महालक्ष्मी ही चार-पाच वर्षांपूर्वी भाड्याच्या घरात राहून काम करत होती आणि २०१५ ते २०१७ या कालावधीत ती केवळ आठ हजार पगारावर गारमेट्समध्ये काम करत होती. या वेळीच तिला भेटलेल्या एका महिलेने तिला या रॅकेटमध्ये ओढले व ती या व्यवसायाकडे वळली. आता ती मुलांच्या विक्रीमधून कोट्यधीश बनली आहे. २०१७ पासून हा व्यवसाय करणाऱ्या महालक्ष्मीकडे आज स्वतःचे घर, कार आणि भरपूर सोन्याचे दागिने आहेत.

अशी चालते रॅकेट

सुरुवातीला त्या महिलेने महालक्ष्मीला सुमारे २० हजार दिले. २०२१ पासून ती सरोगसी एजंट, सरोगेट माता म्हणून काम करत आहे. संशयितांनी २०२१ नंतर गर्भपातासाठी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्यांचा शोध घेणे सुरू केले. ही माहिती जाणून घेतल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांचा गर्भपात करू नका, मूल होईपर्यंत आम्ही त्यांची काळजी घेऊ, प्रसूतीनंतर बाळ आमच्याकडे देण्यास त्यांचे मन वळवा, सर्व खर्च आमचा राहील. मुलीसाठी दोन लाख आणि मुलासाठी तीन लाख देण्याचा करार त्यांनी अशा गरोदर महिलांशी केला व मुलांना आठ ते १० लाखाला बाहेर विकले.

मुलाच्या जन्मानंतर, अटक केलेल्या व्यक्ती आईला कराराचे पैसे द्यायचे आणि मुलांचे फोटो त्यांच्या स्वत:च्या ग्रुपमध्ये शेअर करण्यास सांगायचे. जर एखाद्या मुलाची गरज असलेल्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला तर बालकाची किंमत लिंग आणि रंगावर आधारित निश्चित केली जाई. मुलीसाठी चार ते सहा लाख, मुलासाठी ८ ते १० लाखाला ते विकत होते. तपासादरम्यान असे समोर आले की, आरोपींपैकी मुरुगेश्वरीने स्वतःचे मूल विकण्याची ऑफर दिली होती आणि जन्माचा दाखलाही दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT