Sharad Pawar_Karnataka CM 
देश

Karnataka CM: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा उद्या शपथविधी; शरद पवारांसह 'हे' बडे नेते लावणार हजेरी

भाजपला धोबीपछाड देत काँग्रेसनं कर्नाटकात दणदणीत विजय मिळवला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : कर्नाटकच्या नवनियुक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या (२० मे) बंगळुरु इथं मोठ्या सोहळ्यात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह देशातील बडे नेते हजेरी लावणार आहेत. (Karnataka CM swearing in ceromoney tomorrow Sharad Pawar along with big leaders will attend it)

शरद पवारांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, "उद्या कर्नाटकात होणाऱ्या शपथविधीला येण्याचं निमंत्रण मला काँग्रेस अध्यक्षांनी फोन करुन दिलं आहे. त्यांनी सांगितलं की देशातील अनेक बडे नेत्यांना यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही देखील या सोहळ्याला हजेरी लावावी. त्यामुळं उद्या मी कर्नाटकला जाणार आहे"

दरम्यान, कर्नाटकात स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरुन बराच खल झाला. मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकायची यासाठी तीन दिवस काँग्रेस हायकमांडपर्यंत मंथन झालं. मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर असलेल्या सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह हाकमांड अर्थात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या भेटीही घेतल्या.

या सर्व मंथनानंतर अखेर सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली तर डीके शिवकुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर या दोन्ही नेत्यांनी राज्यपाल थांवरचंद गेहलोत यांची भेट घेऊन त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. तसेच मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा कार्यक्रम त्यांना सांगितला. त्यानुसार, २० मे २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT