बंगळूर : विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. या वेळी काँग्रेसचे आमदार (Congress MLA) चक्क बैलगाडीतून (Bullock Cart) विधानसौधपर्यंत आले आणि त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
विधानभवनात हा एक चर्चेचा विषय ठरला. मंड्याचे काँग्रेस आमदार रविकुमार गौडा गानिग (Ravikumar Gowda Ganiga) यांच्यासह अनेक आमदार विधानसौधच्या केंगाल गेटच्या मुख्य गेटमधून पश्चिमेकडील गेटकडे बैलगाडीतून आले.
विधानसौधाच्या पायरीवर अभिवादन करत नूतन आमदार भागीरथी मुरळ्या यांनी विधानसौधमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी तेथे आलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे चरणस्पर्श करून त्यांनी आशीर्वाद घेतला. त्यांच्यासमवेत सभागृहात येणाऱ्या नूतन आमदारांनीही प्रवेशद्वाराला वंदन करून विधानसौधात प्रवेश केला.
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विधानसौधासमोर गोमूत्र शिंपडले. कर्नाटक काँग्रेसचे सरचिटणीस एस. मनोहर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘‘राज्यातील मागील भ्रष्ट भाजप सरकारची सुटका करून स्वच्छ प्रशासन चालवण्यासाठी जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले आहे. विधानसौधासमोर विशेष पूजा करून जनतेला मिठाईचे वाटप करण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.