राष्ट्रध्वजाबद्दल वक्तव्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी काँग्रेस आमदारांनी केली आहे.
बेंगळुरु - गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात हिजाबवरून वाद सुरु आहे. त्यातच आता तिरंग्यावरून कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री केएस ईश्वराप्पा यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे ईश्वराप्पा यांना बरखास्त करा आणि राष्ट्रध्वजाबद्दल वक्तव्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी काँग्रेस आमदारांनी केली आहे. यासाठी त्यांनी गुरुवारी रात्री विधानसभेतच मुक्काम केला. ईश्वराप्पा यांनी नुकताच असा दावा केला होता की, भगवा झेंडा भविष्यात राष्ट्रीय ध्वज होऊ शकतो.
कर्नाटक विधानसभेत काँग्रेस आमदारांनी रात्रभर मुक्काम केला. याचे व्हिडिओ आथा समोर येत आहेत. यात अनेक आमदार गाद्यांवर झोपल्याचं दिसतं. विधानसभेच्या लॉबीत गाद्या टाकून तिथेच रात्रभर आमदारांननी मुक्काम केला. मंत्री केएस ईश्वराप्पा यांच्या भगव्या झेंड्याच्या वक्तव्या प्रकरणी काँग्रेस आमदारांनी राजीनाम्याची मागणी केली आहे.
याआधी गुरुवारी विरोधी पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घातल्यानं विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतरही काँग्रेस आमदार विधानसभेच्या सभागृहात थांबून होते. आमदारांच्या गोंधळामुळे सलग दोन दिवस विधानसभेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज होऊ शकले नाही.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी आणि माजी मुख्यमंत्री येडियुर्प्पा यांनी विधानसभा परिसरात विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे गटनेते सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा केली. मात्र या चर्चेतूनही काही मार्ग निघाला नाही.
येडीयुरप्पा यांनी सांगितलं की, आम्ही जवळपास दोन तास विरोधी पक्षाच्या नेत्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांनी सांगितलं की, विधानसभेत झोपू नका, पण त्यांनी आधीच ठरवलं होतं. सभापतींनीसुद्धा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमच्या बाजूने पुर्ण प्रयत्न केले असल्याचंही येडीयुरप्पा म्हणाले.
काँग्रेसने ईश्वराप्पा यांच्या राजीमान्याची मागणी केली असली तरी मंत्री ईश्वराप्पा यांनी म्हटलं की, मी राजीनामा देणार नाही. कोणथ्याही कारणाने राजीनामा देण्याचा प्रश्न उऱत नाही. मी एक देशभक्त आहे आणि आणिबाणीच्या काळात तुरुंगात गेलो होतो. त्यांनी विरोध करावा, मी मागे हटणार नाही अशा शब्दात ईश्वराप्पा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.