Dr. Rashmi Shashikumar esakal
देश

अख्या कर्नाटकात पोलिसांचा सापळा : 36 हजार फोन नंबर, 700 संशयित

बाळकृष्ण मधाळे

बेळगांव : कर्नाटकमधील (karnataka) एक जोडपं 29 मे रोजी आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस (Birthday) साजरा करण्याच्या तयारीत होतं. सगळी तयारीही झाली होती. संपूर्ण घर फुलं, फुग्यांनी सजवण्यात आलं होतं. घराच्या चारही बाजूंनी रोषणाई करण्यात आली होती. बर्‍याच वर्षांनंतर त्यांच्या घरी मुल आलं होतं, त्यामुळे सर्वच जण खूप खुश होते. आनंदी होते. कुटुंबातील प्रत्येकजण आनंदानं नाचत होता. काही वेळात केकही कापला जाणार होता; पण त्याच वेळी कुठून तरी माशी शिंकावी, असाच काहीसा प्रकार घडला आणि दारात चक्क पोलिसांचा फौजफाटा.. दारात पोलिस पाहुन सगळेच घाबरुन गेले. कोणाला काहीच कळत नव्हतं. पोलिसांनी घराला घेरलं होतं. त्यातील एका पोलिस प्रमुखानं त्या जोडप्याच्या घरी प्रवेश केला आणि त्या जोडप्याला एक धक्कादायक बातमी दिली. त्यांच्या संपूर्ण आनंदावर विर्जण पडलं, ते हतबल झाले. निराश होऊन दाम्पत्य खाली कोसळलं. तद्नंतर पोलिसांनी त्यांना उठवून पाणी दिलं. पोलिसांनी त्यांना संपूर्ण हकीकत सांगायला सुरुवात केली. ज्या मुलाचा वाढदिवस तुम्ही साजरा करत आहात, ते तुमचं मुलं नाही. या पोलिसांच्या वक्तव्यानं दाम्पत्याला घाम फुटला. त्याच दरम्यान त्या दाम्पत्याच्या मनात हे बाळ चोरीचं तर नाही ना?, अशी शंका चुकचुकली. इथं घडलेली घटना एखाद्या सस्पेंस थ्रिलर चित्रपटाची कथा असावी अशीच होती. खरं तर, डॉक्टरांनी मुलास सरोगसीद्वारे पालक बनलेल्या जोडप्याकडे विकलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) डॉ. रश्मी शशिकुमार (Dr. Rashmi Shashikumar) हिला अटक केलीय. (Karnataka Doctor Held A Year After She Stole Baby From Bengaluru Hospital Sold In Koppal Couple)

कर्नाटकमधील एक जोडपं 29 मे रोजी आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस (Birthday) साजरा करण्याच्या तयारीत होतं. सगळी तयारीही झाली होती. संपूर्ण घर फुलं, फुग्यांनी सजवण्यात आलं होतं. घराच्या चारही बाजूंनी रोषणाई करण्यात आली होती. पण...

विजयनगरमध्ये (Vijayanagar) राहणारी रश्मी काही वर्षांपूर्वी बेंगळुरूमधील बाणेरघट्टा (Bannerghatta) रोडवरील नामांकित खासगी रुग्णालयात ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करू लागली होती. पोलिसांनी सांगितलं की, तिच्या सोबतचा डॉक्टर हा बेळगांव जिल्ह्यातील चिक्कोडीचा (Chikkodi) आहे. सरोगसीद्वारे मूल मिळविण्यासाठी डॉक्टरानं या जोडप्याकडून तब्बल 14.5 लाख रुपये घेतलं होतं आणि मे 2020 मध्ये चोरी केलेलं हे मूल त्या उत्तर कर्नाटकातील श्रीमंत जोडप्याला दिलं होतं.

2020 मध्ये बाळाची प्रसूती?

उत्तर कर्नाटकातील कोप्पळ येथील रहिवासी असलेल्या एका जोडप्यानं 2015 मध्ये हुबळीतील खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉ. रश्मीची भेट घेतली. रश्मी (Rashmi) ही 31 वर्षीय महिला मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) म्हणून हुबळीतील (Hubali) एका नामांकित रुग्णालयात कार्यरत होती. या जोडप्याला एक दिव्यांग मूल होतं, त्याच्या उपचाराकरिता ती डॉ. रश्मीची मदत घेणार होती. दोन-तीन भेटीतच मुलाच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याचं त्या आईच्या लक्षात आलं, तिचा रश्मीवरील विश्वास वाढला. दोघी चांगल्या मैत्रिणी झाल्या. एकदा त्या मुलाच्या आईनं काही आरोग्यविषयक समस्यांमुळे आपण पुन्हा आई बनू शकत नसल्याचं सांगितलं. त्यावर रश्मीने तिला सरोगसीची (Surrogacy) कल्पना सुचवली. तद्नंतर नवऱ्याशी चर्चा केल्यानंतर त्या आईनंही याला मान्यता दिली. 2019 मध्ये तिने स्पर्मचे नमुनेही घेतले व 2020 मध्ये बाळाची प्रसूती होईल, असंही तिनं त्या जोडप्याला सांगितलं. तद्नंतर एक दिवस रश्मीनं या सरोगसीच्या माध्यमातून आपल्या बाळाची वाट पाहणाऱ्या श्रीमंत जोडप्याला एक सरोगेट आई सापडल्याचं सांगितलं. तसंच आयव्हीएफ प्रक्रियाही यशस्वी झाल्याचं सांगितलं. यामुळे ते जोडपं बाळाची आतुरतेनं वाट पाहू लागलं होतं.

Baby

आंध्र प्रदेशमधील जोडप्याच्या मुलाची चोरी

रश्मी बेंगळुरुच्या विविध भागात सरकारी रुग्णालयात (Government Hospitals) फिरली आणि काही कर्मचार्‍यांशी तिनं मैत्री केली. या रुग्णालयात कधी कोणाची प्रसुती होणार आहे आणि आई-वडील कोण आहेत याचीही ती चौकशी करत होती. अखेर तिनं चामराजपेट इथल्या सिरसी सर्कलजवळील बीबीएमपी (BBMP) हॉस्पिटलवर आपलं लक्ष केंद्रित केलं. गेल्या वर्षी 29 मे रोजी रश्मीनं चामराजपेट येथील बीबीएमपीच्या सरकारी दवाखान्यातून मुलाला चोरून नेलं होतं. मुलाचे आई-वडील नावेद पाशा आणि हुस्ना बानो नोकरीच्या शोधात आंध्र प्रदेशहून (Andhra Pradesh) बेंगळुरू येथे आले होते. सकाळी 7.50 च्या सुमारास बाळाचा जन्म झाला आणि सकाळी दहाच्या सुमारास पाशा आपल्या बहिणीला घरी सोडण्यासाठी हॉस्पिटलमधून बाहेर गेला. त्यानंतर रश्मीनं येथील एका लेडी नर्सला सांगून बानोला बाळाच्या आईला झोपच्या गोळ्या दिल्या व रश्मी तेथील निरोगी बाळ घेऊन पसार झाली. त्यानंतर जेव्हा बानो (बाळाची आई) 45 मिनिटांनंतर उठली, तेव्हा तिच्या लक्षात आलं की, आपलं बाळ (Baby) हरवलंय. तिने डाॅक्टरांशी चर्चा केली, पण कुठेच बाळाचा थांगपत्ता लागत नव्हता. सीसीटिव्हीमध्ये देखील पाहिलं, पण त्यात कुठेच बाळ दिसलं नाही. ती रडू लागली. तिला काहीच समजत नव्हतं. दुसर्‍याच दिवशी चामराजपेट पोलिसांत तक्रार दाखल केली गेली आणि हा खटला डिसेंबर 2020 पर्यंत बसवणगुडी महिला पोलिस ठाण्यात (Basavangudi Ladies Police Station) वर्ग करण्यात आला.

Hospital

कर्नाटकातील हॉस्पिटल्समध्ये रचला सापळा

दरम्यान, रश्मी बाळाला घेऊन विजयनगरमधील एका मित्राच्या घरी गेली. तिथं तिनं त्या उत्तर कर्नाटकातील श्रीमंत जोडप्याला येण्यास सांगितलं होतं. रश्मीनं ते बाळ त्या जोडप्याच्या हवाली केलं आणि त्यांच्याकडून 14.5 लाख रुपये घेऊन ती निघून गेली. एकडे पोलिसांचा ससेमेरा सुरुच होता. मात्र, याची रश्मीला कोणतीच खबर नव्हती. बसवणगुडी पोलिसांनी अख्या कर्नाटकांत आपला सापळा रचला. विविध रुग्णालयात रश्मीची चौकशी सुरु केली. सीसीटिव्ही फुटेजही चेक करण्यात येत होते. हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांची चौकशी करून सर्वात जवळच्या टॉवर रेंजशी जोडलेल्या सर्व सेल फोनचे नंबर जमा केले. तब्बल 35 ते 36 हजार फोन नंबर होते. त्याची वर्गवारी करण्याचं किचकट काम सुरू करण्यात आलं. त्यातून 700 संशयित फोन वेगळे करण्यात आले. मात्र, हाती काहीच लागत नव्हतं. परंतु पोलिसांनी आपला तपास आणखी गतीमान करत रश्मीचा शोध घेतलाच. तिला विजयनगरमधून अटक करण्यात आले असून तिने आपला गुन्हा देखील कबुल केला आहे. तिच्या या फिल्मी स्टाइल अटकेनंतर आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Basavangudi Ladies Police Station

पोलिसांनी सांगितला 'बाळ चोरी'चा थरार

डीसीपी (दक्षिण) हरीश पांडे DCP (South) Harish Pandey म्हणाले, आम्ही 700 हून अधिक लोकांची चौकशी केली. रश्मीनं सांगितलं, की तिनं अनेक सरकारी रुग्णालयं शोधली. मात्र, सुरक्षेच्या अभावामुळे तिनं चामराजपेटमधील रुग्णालय निवडलं. 27 आणि 28 मे रोजी ती हुस्ना बानोच्या वार्डात 3-4 वेळा गेली आणि बेड्सचे योग्य निरीक्षण केलं. 29 मे रोजी रश्मीनं वॉर्डमध्ये प्रवेश केला आणि मुलाला चोरत असताना ती बानोला सापडली. त्यानंतर तेथील एका नर्सच्या सहाय्यानं तिला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि बाळा तेथून पळवलं. रश्मी बेंगळुरुच्या (Bengaluru) विजयनगरमधील रहिवासी असून, तिला सव्वा महिन्याची मुलगी आहे. तिच्या नवऱ्याला व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागला आणि तिच्यावर 4 ते 5 लाख रुपयांचं शैक्षणिक कर्ज होतं. त्यामुळे तिनं हा प्रकार केला असल्याचे पांडे यांनी सांगितले.

Karnataka Doctor Held A Year After She Stole Baby From Bengaluru Hospital Sold In Koppal Couple

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT