Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजप-काँग्रेससह जेडीएस आमने-सामने आहेत. त्यातच आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षानं स्टार प्रचारकांची (BJP Star Campaigner) यादी जाहीर केली आहे.
या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याबरोबरच मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), स्मृती ईराणी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि कर्नाटकचे माजी खासदार प्रभाकर कोरे यांचा समावेश आहे.
याशिवाय, यादीत सामील असलेल्या अन्य नेत्यांमध्ये कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, योगी आदित्यनाथ, शिवराजसिंग चौहान, हेमंत बिसवा सरमा, माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा, सदानंद गौडा, कर्नाटक भाजपचे अध्यक्ष नलीन कटिल, केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी, के. एस. ईश्वरप्पा, एम. गोविंद काजरोळ, आर. अशोक यांचा देखील समावेश आहे.
तसेच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, मनसुख मंडाविया, तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अण्णामलाई, अरुण सिंग, डी. के. अरुणा, सी. टी. रवी, शोभा करंदलजे, ए. नारायणस्वामी, भगवंत खुबा, अरविंद लिंबावली, बी. श्रीरामुलू, कोटा श्रीनिवास पुजारी, बसनगौडा पाटील यत्नाळ, उमेश जाधव, सी. नारायणस्वामी, एन. रवीकुमार, जी. व्ही. राजेश आदींना देखील प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आलंय. कर्नाटक विधानसभेसाठी येत्या 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.