Karnataka Election 2023  
देश

Karnataka Election 2023 : कर्नाटक विजयाचा 'बजरंगबली' सापडला, ज्यु.प्रशांत किशोर आहे काँग्रेसचा किंगमेकर

Sandip Kapde

Karnataka Election 2023 : काँग्रेसने कर्नाटकमध्ये मोठा विजय मिळवला आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपचा सुपडा साफ झाला आहे. भाजपला १३६ च्या जवळपास जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपला ६५ जागा मिळाल्याची माहिती आहे. काँग्रेसाठी हा सर्वात मोठा विजय मानल्या जात आहे. काँग्रेसच्या या विजयाचा अनेकजण श्रेय घेत आहेत.

काँग्रेसच्या विजयाचे अनेकजण शिल्पकार आहे. राहुल गांधींपासून ते मल्लिकार्जुन खर्गे आणि कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यापर्यंत विजयाचे श्रेय जाऊ शकते. परंतु या सर्वांमध्ये एक नाव आणि चेहरा आहे, ज्याच्या बाजूने सर्व एकमताने उभे राहतील. कर्नाटकात काँग्रेसच्या विजयासाठी रणनीती बनवणाऱ्या आणि आजच्या निकालाची पटकथा लिहिणारे सुनील कानुगोलूचं नाव समोर आले आहे.

सुनील कानुगोलू कर्नाटकातील काँग्रेसच्या प्रमुख रणनीतीकारांपैकी एक आहेत. संपूर्ण निवडणुकीदरम्यान, त्यांनी जनतेशी विस्तृत आणि तपशीलवार संपर्क साधला. त्यासाठी रणनीती तयार करण्यात आली. भाजपची निवडणूक भाषणे आणि अजेंडा याचा अभ्यास करुन पलटावार करण्याची रचना तयार केली.

भाजपच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजवला. विधानसभा निवडणुकीत एवढ्या मोठ्या यशाचे श्रेय संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्याला जाते. पण प्रचाराच्या नवनवीन पद्धती शोधून काढणे, लोकांची नाडी जाणून घेण्यासाठी वेगवेगळे सर्वेक्षण करणे आणि त्याद्वारे उमेदवार विजयी करणे ही जबाबदारी सुनील कानुगोलू यांच्यावर होती. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले आहे.

कोण आहेत सुनील कानुगोलू?

काँग्रेसने सुनील कानुगोलू याला गेल्या वर्षी मार्चमध्ये निवडणूक रणनीतीकार म्हणून पक्षात स्थान दिले होते. काँग्रेसने गेल्या वर्षी मे महिन्यात २०२४ साठी टास्क फोर्सची स्थापना केली होती. यामध्ये निवडणूक रणनीतीकार सुनील कानुगोलू यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. सुनील कानुगोलू यानी यापूर्वी डीएमके, एआयएडीएमके आणि भाजपसोबतही काम केले आहे. राहुल गांधींच्या कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेचे श्रेयही त्याला दिले जाते.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपसाठी, १०१९ च्या संसदीय निवडणुकीत DMK आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूमध्ये AIADMK साठी निवडणूक रणनीती तयार आखली होती.

कानुगोलूने २०१४ पूर्वी प्रशांत किशोर यांच्यासोबत देखील काम केले आहे. सुनील कानुगोलू २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख घटक होता आणि त्यानी भाजपच्या असोसिएशन ऑफ बिलियन माइंड्स (ABM) चे प्रमुख म्हणून काम केले आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधील भाजपच्या निवडणूक प्रचारात महत्त्वाची देखील त्याने भूमिका बजावली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT