Karnataka Assembly Election 2023 esakal
देश

Laxman Savadi : भाजपला मोठा धक्का; तिकीट न दिल्यामुळं माजी उपमुख्यमंत्र्यानं दिला पक्षाचा राजीनामा

कर्नाटकातील अथणी मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे.

Balkrishna Madhale

प्रदीर्घ विचारमंथनानंतर भाजपनं मंगळवारी रात्री कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकातील अथणी मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. तिकीट न दिल्यामुळं नाराज झालेल्या लक्ष्मण सवदी (Former Karnataka Deputy CM Laxman Savadi) यांनी भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय.

कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट नाकारण्यात आल्यानंतर लक्ष्मण सवदी म्हणाले, 'मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. भिकेचा कटोरा घेऊन फिरणारा मी नाही. मी एक स्वाभिमानी राजकारणी आहे.'

प्रदीर्घ विचारमंथनानंतर भाजपनं मंगळवारी रात्री कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे त्यांच्या पारंपारिक शिग्गाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर, त्यांच्या सरकारमधील मंत्री आर अशोक कनकपुरा मतदारसंघातून काँग्रेस नेते डीके शिवकुमार आणि दुसरे मंत्री व्ही सोमन्ना वरुणा विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुध्द निवडणूक लढवणार आहेत.

भाजपने 52 नवे चेहरे निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. 189 उमेदवारांच्या यादीत 32 इतर मागासवर्गीय (OBC) आहेत, तर 30 अनुसूचित जाती आणि 16 अनुसूचित जमातीचे आहेत. उमेदवारांच्या पहिल्या यादीत एकूण आठ महिलांना स्थान मिळालं आहे. कर्नाटकात पूर्ण बहुमतासह सत्तेत परतण्याचं लक्ष्य असलेल्या भाजपनं विधानसभेच्या एकूण 224 जागांपैकी किमान 150 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT