bjp ,congress esakal
देश

Karnataka Election Result: लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील पराभव भाजपला किती मोठा धक्का; जाणून घ्या

रुपेश नामदास

कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर मतमोजणी सुरू आहे. यात काँग्रेस आघाडीवर आहे. कर्नाटकात काँग्रेस प्रमुख पक्ष म्हणून उदयास येत असल्याचे ट्रेंडवरून स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या कलावरून काँग्रेसला १२८, भाजपला ६८ आणि जेडीएसला २२ जागा मिळू शकतात.

दक्षिणेकडील राज्यातील निकालांचा परिणाम पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर होणार हे नक्की. भाजपने एकमेव दक्षिणेकडील राज्य गमवले आहे. त्याचा परिणाम 2024 च्या लोकसभा निवडणुकीवरही होणार आहे.

जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ​​लालन सिंह यांनी निकालापूर्वी भाकीत केले की भाजप "निवडणूक मोठ्या फरकाने पराभूत होणार आहे". ते पुढे म्हणाले की, आगामी काळात मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीतही भाजपचा पराभव होईल.

कर्नाटकात जागा कमी होऊ शकतात

भाजप ही निवडणूक हरली आहे त्या मुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपच्या जागा कमी होऊ शकतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, राज्यातील 28 जागांपैकी भाजपने 25 जागा जिंकल्या आणि त्यांच्या समर्थित अपक्ष उमेदवारांनी एक जागा जिंकली तर काँग्रेस-जेडीएसला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. यावेळी कर्नाटकात भाजपचा पराभव झाल्यामुळे राज्यात 2019 वेळी मिळवलेल्या जागांची पुनरावृत्ती करणे अवघड होऊन बसणार आहेत.

दक्षिण भारतातील इतर राज्यांमध्येही पराभवाचा सामना करावा लागतो.

दक्षिण भारतातील राज्यांमध्ये कर्नाटक हे भाजपसाठी सर्वात मजबूत राज्य मानले जाते. येथे भाजपने यापूर्वीही अनेकवेळा सरकार स्थापन केले आहे. पुढील वर्षी 2024 च्या लोकसभा निवडणुका होणार आहेत, अशा परिस्थितीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. आता दक्षिण भारतातील तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांमध्ये विजय मिळवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये लोकसभेच्या एकूण 130 जागा आहेत, त्यापैकी भाजपकडे सध्या फक्त 29 जागा आहेत. त्यापैकी एकट्या कर्नाटकातून त्यांना 25 जागा मिळाल्या आहेत. तेलंगणातून भाजपचे चार खासदार आहेत. कर्नाटकातील भाजपच्या पराभवामुळे दक्षिण भारतातील अन्य राज्यांमध्ये खाती उघडणे कठीण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कर्नाटकचा पराभव म्हणजे भाजपसाठी लोकसभा निवडणुकीत धक्का.

कर्नाटकचा भूगोल पाहता उत्तरेला महाराष्ट्र, वायव्येला गोवा, दक्षिणेला केरळ, आग्नेयेला तामिळनाडू, पूर्वेला आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आहे. कर्नाटकसह, या सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण जागांची संख्या 179 आहे. म्हणजेच कर्नाटक विधानसभेत कमळ न फुलणे म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या मार्गात भाजपच्या वाटेत काटे पेरले गेले आहेत.

सहा दक्षिणेकडील राज्यांमधून लोकसभेच्या 130 जागा आहेत. लोकसभेच्या एकूण जागांपैकी या सुमारे 25 टक्के आहेत. म्हणजेच दक्षिण भारत राजकीयदृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे.

2019 मध्ये भाजपला कर्नाटक आणि तेलंगणामध्ये जागा मिळाल्या होत्या, परंतु उर्वरित दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपला जागा मिळाल्या नाहीत. कर्नाटकच्या माध्यमातून भाजपला दक्षिणेत पाय पसरवायचे होते, मात्र कर्नाटकातील धक्यामुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आणि इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपचे मोठे राजकीय नुकसान होऊ शकते. तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारचा पराभव करण्यासाठी भाजपला कर्नाटक जिंकणे अत्यंत आवश्यक होतं.

जागा मिळवनं भाजपसाठी आव्हान असेल.

कर्नाटकसोबतच पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, महाराष्ट्रातही भाजपच्या जागा कमी होऊ शकतात. या राज्यांतील जागांचा पराभव भरून काढण्यासाठी भाजपला नवीन राज्ये शोधावी लागतील, जे सर्वात मोठे आव्हान असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT