Karnataka Election Result 2023 esakal
देश

Karnataka Result : 'बेळगाव'वर काँग्रेस हायकमांड होणार मेहरबान; 'या' बड्या नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता!

राज्यात काँग्रेस पक्षाला (Congress Party) बहुमत मिळाल्यावर मंत्रिपदाची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरच लगेचच आता मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

बेळगाव : राज्यात काँग्रेस पक्षाला (Congress Party) बहुमत मिळाल्यावर मंत्रिपदाची चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिपदासाठी जिल्ह्यातून चार नावे चर्चेत आली आहेत. त्यामध्ये पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi), माजी मंत्री व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी व बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) यांचा समावेश आहे.

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरच लगेचच आता मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. २०१३ ते १८ या काळात राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेत असताना सतीश जारकीहोळी यांना मंत्रिपद मिळाले होते. शिवाय ते बेळगाव जिल्हा पालकमंत्रीही झाले होते. प्रारंभी त्यांच्याकडे अबकारी खाते होते, पण त्यांनी खाते बदलून देण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली, शिवाय मंत्रिपदाचा राजीनामाही दिला.

जारकीहोळींना महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता

त्यानंतर त्यांना लघुउद्योग खाते मिळाले होते, पण २०१६ साली झालेल्या मंत्रिमंडळ पुनर्रचनेत सतीश यांच्याऐवजी त्यांचे बंधू रमेश जारकीहोळी यांना मंत्रिपद दिले गेले. २०१८ साली राज्यात काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आघाडी सरकार सत्तेत आले. त्यावेळी पुन्हा सतीश यांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती, पण ते आघाडी सरकार केवळ एकच वर्ष टिकले होते. आता पुन्हा त्यानी मंत्रिपद मिळणार हे नक्की आहे. यावेळी महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसची सत्ता आल्यावर पुन्हा हुक्केरी झाले मंत्री

प्रकाश हुक्केरी (Prakash Hukkeri) यांच्याकडूनही मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. २००४ साली राज्यात काँग्रेस व धजदचे आघाडी सरकार असताना हुक्केरी यांना फलोत्पादन खात्याचे मंत्रिपद मिळाले होते. शिवाय ते जिल्हा पालकमंत्रीही होते. २००६ साली हे आघाडी सरकार कोसळले, त्यामुळे त्यांचे मंत्रिपद गेले. २०१३ साली राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यावर पुन्हा हुक्केरी मंत्री झाले. त्यांच्याकडे धर्मादाय खात्याची जबाबदारी देण्यात आली. २०१४ साली चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले. आता पुन्हा ते मंत्री होण्यासाठी इच्छुक आहेत.

सवदींना गमवावे लागले होते उपमुख्यमंत्रिपद

माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी कोणतीही अट न घालता काँग्रेस पक्षात प्रवेश केला खरा, पण नव्या काँग्रेस सरकारमध्ये त्यांनाही मंत्रिपद मिळू शकते. भाजप सरकार सत्तेत असताना सवदी यांना थेट उपमुख्यमंत्रिपद मिळाले होते. सवदी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना त्यांना एवढे मोठे पद मिळाले होते. उपमुख्यमंत्री झाल्यावर ते विधानसभेवर निवडून गेले होते. २०२१ साली राज्यात मुख्यमंत्री बदल झाल्यानंतर सवदी यांना उपमुख्यमंत्रिपद गमवावे लागले होते. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत, पण महिला कोट्यातून त्यांना मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता आहे. मतदानाच्या दिवशी त्यांनी त्याबाबत सूतोवाचही केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT