काँग्रेसला कर्नाटकात बहुमत मिळाले आहे. काँग्रेसला १३६ जागांवर विजय मिळवला तर भाजपला फक्त ६५ जागांवर समाधान मानावे लागले. जेडीएला १९ जागा मिळाल्या. याशिवाय कल्याण राज्य प्रगती पक्ष आणि सर्वोदय कर्नाटक पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर ममता बॅनर्जींनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. तर कर्नाटकच्या जनतेचे केले अभिनंदन केले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा.
कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या निकालात काँग्रेस पक्षाची बहुमताकडे वाटचाल होत असल्याने याचा आनंद व्यक्त करत मंगळवेढा काँग्रेसने तब्बल 9 वर्षानंतर विजयाचा जल्लोष गुलालाच्या उधळणीने साजरा केला.
विजयपूर जिल्ह्यात काँग्रेसचा तिसरा उमेदवार विजयी झाला आहे. काँग्रेसचे माजी गृहमंत्री एम. बी. पाटील यांना जास्त मते मिळली आहेत. विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर मतदार संघातून सलग चौथ्यादा त्यांनीच मुसंडी मारल्याचे दिसत आहे. भाजप उमेदवार विजूगौडा पाटील यांचा पराभव झालाय.
काँग्रेसने एकहाती सत्ता राखल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. डी.के.शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांना दिल्ली हायकमांडने दिल्लीत बोलावले आहे.
आम्ही 130 जागांचा आकडा पार करू, हा काँग्रेसचा मोठा विजय आहे. कर्नाटकातील लोकांना बदल हवा होता कारण ते भाजप सरकारला कंटाळले होते. भाजपने ऑपरेशन लोटसवर पैसा खुप खर्च केला. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा फायदा झाला. अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी व्यक्त केलीय.
कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार हे १ लाखं मतांनी विजयी झाले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांना अश्रु अनावर झाले.
बेळगावमध्ये दक्षिणमधून भाजपचे अभय पाटील विजयी झाले आहेत. एकीकरण समितीचे रमाकांत कोंडूसकर यांचा पराभव झाला आहे. हुबळीमधून जगदीश शेट्टार यांचा पराभव झाला आहे.
मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई शिगगाव मतदारसंघातील भाजप कॅम्प ऑफिसमध्ये आहेत. तेथील त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेसने 117 जागांवर आघाडी घेतली आहे तर भाजप 75 जागांवर आघाडीवर आहे.
काँग्रेसचे टी रघुमूर्ती विजयी. चालगिरामधून त्यांनी १६ हजार मतांनी विजय
ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार काँग्रेस पार्टी सुपरस्टार अशा घोषणा सुरू आहेत. काँग्रेस सत्तेच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. हाती आलेल्या निकालानुसार, काँग्रेस ११५ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ७३.
आत्तापर्यंत आलेल्या निकालादरम्यान काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस वरिष्ठ नेत्यांची बैठक बंगळुरूमध्ये सुरु आहे. नेमकं काय चर्चा सुरु आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेसच्या हालचालींना वेग आला आहे.
काँग्रेसमध्ये हालचालींन वेग आला आहे. निकालामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते जल्लोष साजरा करताना दिसत आहेत.
कर्नाटक अपडेट निवडणूक आयोग नुसार २२४ पैकी १८६ जागांमध्ये काँग्रेस ९५ भाजप ६४ जदस २२ आघाडीवर आहे.
निपाणीची दुसरी फेरी संपली आहे
भाजप - 6693
राष्ट्रवादी-4884
काँग्रेस - 4940
भाजपच्या शशिकला जोल्ले १७५३ मतांनी आघाडीवर आहेत.
आता निपाणीतून मोठी बातमी समोर येत आहे. निपाणी मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांनी आघाडी घेतली असून भाजपच्या शशिकला जोल्ले, कॉंग्रेसचे काकासाहेब पाटील पिछाडीवर आहेत. उत्तम पाटील सध्या 777 मतांनी आघाडीवर आहेत.
आत्ता हातात आलेल्या निकालानुसार, भाजप काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. शिगगावमधून भाजपचे बोम्मई आघाडीवर आहेत. एकीकरणाचा एकही उमेदवार आघाडीवर नाही. भाजप ९७ तर काँग्रेस १०६ तसेच डेडीएस १९ .
सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेस बहुमतापासून ७ जागा दुर असल्याची अपडेट समोर आली आहे. बेळगावमध्ये काँग्रेस ७ जागंवर आघाडीवर आहे. तर भाजप २ जागांवर आघाडीवर आहेत.
रामनगरातील चन्नापटना विधानसभा मतदारसंघातून कुमारस्वामी पिछाडीवर आहेत. -हुबळी धारवाडमध्ये मतदारसंघातून काँग्रेस नेते जगदीश शेट्टर पिछाडीवर आहेत.
आत्तापर्यंत पहिले १८३ निकाल हाती आले आहेत. कलांमध्ये भाजप ७३ आणि काँग्रेसने ९३ जागांवर बाजी मारली आहे. कर्नाटकात काँग्रेसची सेंच्युरी मारली आहे. भाजप ८४ काँग्रेस १०१ तर जेडीएस १४ असा निकाल आत्ता हाती आला आहे.
कर्नाटक मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतं मोजली जात आहेत. काॅंग्रेस एक जागेवर आघाडी आहे.
विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी किमान 113 जागांची आवश्यकता आहे. त्यापैकी अनुसूचित जाती (SC) साठी ३६ जागा.अनुसूचित जमाती (ST) साठी १५ जागा राखीव आहेत.
सिंगापूरला रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘धजदला (JDS) ५० जागा मिळतील. धजद फार कमी जागांवर जिंकेल, असा अंदाज अनेक सर्वेक्षणांनी वर्तवला आहे; मात्र आमच्या पक्षाला ५० जागा मिळतीलच.’
राज्यभरातील 36 केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
दुपारपर्यंत राज्यातील राजकीय चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. आज दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडं देणार आज ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.