Karnataka Election Result 2023 Raju Kage Laxman Savadi esakal
देश

Karnataka Election : 'ही दोस्ती तुटायची नाय..'; आमदारकीपासून दूर असलेले सवदी, कागे पुन्हा विधानसभेत

अनेक वर्षांत आमदारकीपासून दूर असलेले राजू कागे व लक्ष्मण सवदी (Laxman Savadi) हे राजकीय दोस्त वेगळे झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत दोघेही पराभूत झाले होते.

अथणी : अनेक वर्षांत आमदारकीपासून दूर असलेले राजू कागे व लक्ष्मण सवदी (Laxman Savadi) हे राजकीय दोस्त वेगळे झाले होते. आता हे दोघे पक्ष बदलून पुन्हा विधानसभेत जात आहेत. त्यात सवदी यांच्यामुळे राजू कागे यांचा विजय सोपा झाला. त्यामुळं ही दोस्ती कायम राहणार आहे.

अथणी व कागवाड विधानसभा मतदारसंघांत एक वेगळाच बदल घडवून आणला आहे. अखेरच्या टप्प्यात दोस्ती एकत्र आली. त्या दोघांनी मतदारसंघात काँग्रेसचा (Congress) झेंडा फडकवला. २००४ मध्ये कर्नाटकाचे भाजपचे राज्य अध्यक्ष अनंतकुमार यांच्या उपस्थितीत लक्ष्मण सवदी आणि राजू कागे (Raju Kage) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवून सतत तीन वेळा हॅट्रिक केली.

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण सवदी भाजपमध्ये राहिले तर राजू कागे काँग्रेसमध्ये राहिले. त्यामुळे एकमेकांमध्ये वेगळे पक्ष निर्माण होऊन सवदी भाजपमधून तर कागे यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली. दोघे वेगळ्या पक्षात असले तरी दोघेही पराभूत झाले होते. २०१८ च्या विधानसभेत दोघेही पराभूत झाले. त्यानंतर ऑपरेशन कमळच्या माध्यमातून सवदींचे विरोधक महेश कुमठळ्ळी व कागेंचे विरोधक श्रीमंत पाटील दोघेही भाजपमध्ये गेले.

त्यामुळे २०१९ निवडणुकीत कागे यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली तरीही ते पराभूत झाले. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सवदी यांना डावलले. त्यावेळी कागे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना काँग्रेसमध्ये येण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सवदी यांनी काँग्रेस प्रवेश केला असून त्यांनी कागे यांनाही विजयी करण्यास मदत केली.

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत दोघेही पराभूत झाले होते. राजू कागे घरी बसले. लक्ष्मण सवदी उपमुख्यमंत्री बनले. त्यावेळी राजू कागे काँग्रेसमधून निवडणूक लढवली, परंतु त्यांचा मित्र लक्ष्मण सवदी यांनी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार श्रीमंत पाटील यांना मोठ्या मताधिकाने विजय केले. लक्ष्मण सवदी यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवून मोठ्या मताने विजयी होत वर्चस्व सिद्ध केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT