Karnataka Election Sakal
देश

Karnataka Election Result : काँग्रेसच्या दमदार कमबॅकनंतर शरद पवारांसह देशातल्या या ५ चेहऱ्यांची धाकधूक वाढली!

काँग्रेसच्या या विजयामुळे फक्त भाजपाच नव्हे तर तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नात असलेल्या पक्षांनाही मोठा संदेश गेला आहे.

वैष्णवी कारंजकर

कर्नाटकात काँग्रेसने घेतलेल्या आघाडीमुळे आता पंतप्रधान मोदींचा करिष्मा कमी होऊ लागला आहे का असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. कारण राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधानांनी मोठ्या प्रमाणावर सभा घेतल्या होत्या. भाजपने ज्या प्रकारे बजरंगबली, मुस्लिम आरक्षण असे मुद्दे पुढे करून कर्नाटकचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतरही काँग्रेसचा विजय हा भारतीय जनता पक्षासाठी मोठा धक्का आहे.

हिमाचल प्रदेशपाठोपाठ काँग्रेसचा आलेख ज्या प्रकारे वाढत आहे, त्यामुळे भाजपलाच नव्हे, तर तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या पक्षांनाही मोठा संदेश गेला आहे. असे 5-6 राजकीय चेहरे आहेत ज्यांना कर्नाटक निवडणुकीचे निकाल लक्षात घेऊन आपली रणनीती बदलावी लागेल.

एचडी कुमारस्वामी (जेडीएस)

कर्नाटकातील संपूर्ण निवडणूक भाजप आणि काँग्रेसमध्येच लढली गेली. जेडीएस कुठेच दिसत नव्हते. जेडीएस मजबूत स्थितीत दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्नाटकात जेडीएसचा कमी झालेला पाठिंबा काँग्रेसला थेट फायदा होत आहे. गेल्या निवडणुकीतही जेडीएस तिसर्‍या स्थानावर होता पण त्यांना ३७ जागा मिळाल्या होत्या. त्यांना २०२४ साठीही इशारा मिळाला आहे.

अरविंद केजरीवाल (आम आदमी पार्टी)

'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर कर्नाटकात चमत्कार होईल, अशी आशा होती, मात्र दुपारी बारा वाजेपर्यंतचे ट्रेंड सांगत आहेत की, तेही कर्नाटकात निवडून येणं अवघड आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हेही भाजपविरोधी, काँग्रेसविरोधी आघाडीच्या प्रयत्नात गुंतले आहेत. काँग्रेस पुन्हा मजबूत होत आहे, त्यामुळे केजरीवाल यांनाही आपला मताधिक्य वाढवताना वेगळा विचार करावा लागणार आहे.

ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी यांचा पक्ष त्यांना २०२४ मध्ये भाजपशी टक्कर देण्यासाठी प्रोजेक्ट करत असल्याचे दिसत आहे.

सध्याची परिस्थिती पाहिली तर कर्नाटक निवडणुकीच्या वेळी भाजप नेते आणि संपूर्ण पक्ष 'केरळ स्टोरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना ममता यांनी राज्यात या चित्रपटावर बंदी घातली. मात्र, हिमाचलपाठोपाठ कर्नाटकात काँग्रेसचा विजय म्हणजे भाजपला थेट आव्हान देण्यात काँग्रेसला आघाडी मिळाली आहे.

के. चंद्रशेखर राव

तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचं नाव जेव्हा तेलंगण राष्ट्र समितीपासून भारत राष्ट्र समिती केलं, तेव्हाच ते राष्ट्रीय नेत्यांना रेसमध्ये आल्याचं स्पष्ट झालं. तिसऱ्या आघाडीतल्या नेत्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या, तेव्हा त्यांची ताकद अधिक वाढल्याचं दिसून आलं. पण आता काँग्रेसने दमदार कमबॅक केलं आहे. त्यामुळे केसीआर यांनाही आपले पाय अधिक मजबूतपणे रोवण्याची गरज आहे.

नितीश कुमार व शरद पवार

काँग्रेसच्या याच बळकटीचा परिणाम लक्षात घेता नितीश कुमार व पवारांनाही युपीए बळकट कऱण्याची गरज आहे. तिसऱ्या आघाडीमुळे जर मतं तीन भागांत वाटली गेली, तर याचा फायदाही भाजपाला होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT