आपण लहानपणापासून ऐकत आलोय की, भारत हा भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात सर्वात जास्त संख्या शेती करणाऱ्यांची आहे. पण भारतात सर्वात वाईट स्थिती शेतकऱ्यांचीही आहे. शेतकऱ्याला त्याच्या पिकाची योग्य रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्याने दुःखाने पीक नदीत फेकले किंवा त्यावर ट्रॅक्टर चालवला अशा बातम्या आपण अनेकदा वाचल्या आहेत. असाच एक प्रकार कर्नाटकातून समोर आला आहे. Karnataka Farmer : Karnataka farmer travels 415 km gets 8 rupees for 205 kg onion
सध्या सोशल मिडीयावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यावर २०५ किलो कांद्यासाठी त्या शेतकऱ्याला जी किंमत देण्यात आली आहे या पेमेंट स्लीपचा फोटो व्हायरल झाला आहे. उत्तर कर्नाटकातील गदग (कर्नाटक) येथील एका शेतकऱ्याने ४१५ किलोमीटरचा प्रवास करून बेंगळुरू गाठले. बेंगळुरूच्या यशवंतपूरच्या बाजारपेठेत हा शेतकरी आपल्या कष्टाची किंमत मोजण्यासाठी आला. मात्र त्या कष्टाची किंमत त्याला इतकी मिळाली की ती पाहून शेतकरी ढसाढसा रडायला लागला. ती किंमतीची पावती पाहणाऱ्यांची मनेही हेलावून गेली.
कधी दुष्काळ तर कधी पुराचा सामना करावा लागतो. कधी दिवसेंदिवस वाढणारी महागाई त्यांचे कंबरडे मोडते तर कधी सरकारची धोरणे त्यांचे शत्रू बनतात. सध्या कर्नाटकातील ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. पावडेप्पा हलिकेरी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. तो कर्नाटकातील गदग येथील तिम्मापूर गावचा रहिवासी आहे. पावडेप्पा बाजारात पोहोचल्यावर कांद्याला 200 रुपये प्रतिक्विंटल भाव असल्याचे कळले. पोर्टर चार्जसाठी 24 रुपये, वाहतुकीसाठी 377.64 रुपये असा खर्च वजा केल्यानंतर शेतकऱ्याला केवळ 8.36 रुपये मिळाले. ती पावती पाहून त्याचे डोळे पाणावले. शेतकऱ्याने या पावतीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तसेच इतर शेतकर्यांना बेंगळुरूला येऊन त्यांची पिके विकू नयेत अशा सूचना दिल्या.
पावडेप्पा यांनी सांगितले की, त्यांनी शेतात कांद्याचे पीक घेतले होते. ते वाढवण्यासाठी आणि बाजारात आणण्यासाठी 25,000 रुपये खर्च केला. विशेष म्हणजे कर्नाटकातील शेतकऱ्यांना एवढा कमी भाव मिळेल असे वाटले नव्हते. आमच्या पीकाला यंदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामूळे कांद्याचा आकारही लहान आहे.त्यामूळे एवढे कमी पैसे मिळाले. याचे दु:ख होत आहे.
गदग येथील सुमारे 50 शेतकरी कांदा विक्रीसाठी यशवंतपूर बाजारपेठेत गेले होते. काही दिवसांपूर्वी बाजारात कांद्याचा भाव 500 रुपये प्रति क्विंटल होता. पण, आता तो घसरला आहे. पुणे, महाराष्ट्र आणि तामिळनाडू येथील शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्याची माहितीही पावडेप्पा यांनी दिली. गदग येथील शेतकरी आंदोलन करण्याचा विचार करत असल्याचे पावडेप्पा यांनी सांगितले. कर्नाटक सरकारने किमान आधारभूत किंमत जाहीर करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी असल्याचेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.