Kiran Mazumdar Shaw esakal
देश

... तर देश उद्ध्वस्त होईल, किरण मजुमदार शाॅ यांचा इशारा

किरण मजुमदार शाॅ यांचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

बंगळूरु : कर्नाटकमध्ये हिजाब वादानंतर हलाल मटणवरुन नवीन वाद सुरु झाला आहे. उजव्या विचाराच्या संघटनांनी मंदिर यात्रोत्सवात मुस्लिम व्यापाऱ्यांवर प्रतिबंध लावण्याचे आवाहन केले आहे. त्यावर बायोकाॅनच्या प्रमुख किरण मजुमदार शाॅ (Kiran Mazumdar Bommai) यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना इशारा दिला की राज्यात वाढत चाललेला धार्मिक द्वेष लवकर जर थांबवला नाही तर यात देश उद्ध्वस्त होईल. कर्नाटकातील भाजप (BJP) सरकारने मजुमदार यांच्यावर राजकीय रंग देण्याचा आरोप केला आहे. कर्नाटक सरकारकडून मंदिर परिसरात बिगर हिंदूंना व्यापार करण्यास बंदी घालणाऱ्या नियमाचा हवाला देत काही दिवसानंतर किरण शाॅ यांनी जाहीरपणे चिंता व्यक्त केली होती. (Karnataka Halal Meat Row Communalism Will Destroy Nation, Kiran Mazumdar Urge CM Basavaraj Bommai)

उद्योग क्षेत्रातून आलेली त्यांची पहिली प्रतिक्रिया होती. शाॅ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, कर्नाटकने नेहमी सर्वसामावेशक आर्थिक विकास केला आहे. त्यामुळे आपण अशा सांप्रदायिक बहिष्काराला परवानी देऊ नये. जर आयटीबीटी सांप्रदायिक झाली असेल तर हे आपल्या जागतिक नेतृत्वाला नष्ट करुन टाकेल. मुख्यमंत्री बोम्मई यांनी कृपा करुन या वाढते धार्मिक विभाजन टाळावे, असे आवाहन शाॅ यांनी केले आहे.

किरण मजुमदार यांना मालवीयांचे प्रत्युत्तर

भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी किरण मजुमदार यांना सोशल मीडियावर प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, त्यांचे मत पूर्वग्रह दुषित आहे. हे दुर्दैवीआहे, की किरण शाॅ सारखे लोक आपले व्यक्तिगत, राजकीय मत रंगून मांडतात. त्यास आयटीबीटी क्षेत्रातील भारताचे नेतृत्वाची साथ मिळते. राहुल बजाज यांनी ही एकदा गुजरातसाठी असे विधान केले होते. ते राज्य एक प्रमुख ऑटोमोबाईल उत्पादन केंद्र बनले आहे. जाऊन तेथील आकडे तपासा, असा सल्ला मालवीय यांनी शाॅ यांना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT