बंगळुरु : कर्नाटक हायकोर्टाच्या ६ न्यायाधीशांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे धमकी देणाऱ्यानं ५० लाख रुपयांची खंडणी मागितली असून खंडणीचे पैसे पाकिस्तानातील बँकेच्या खात्यात पाठवण्यास सांगितल्यानं या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. (Karnataka High Court Judges Get Death Threats Sender Demands Money In Pakistan Account)
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बंगळुरुच्या सेन्ट्रल सीईएन पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कर्नाटक हायकोर्टाच्या प्रेस रिलेशन ऑफसरनं तक्रार दिली आहे की, हायकोर्टाच्या के मुरलीधर यांना आंतरराष्ट्रीय फोन नंबरवरुन व्हॉट्सअॅपवर मेसेज आला.
१२ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता हा मेसेज आला. हायकोर्टानं त्यांना कार्यालयीन कामकाजासाठी जो फोन क्रमांक दिला आहे त्यावर हा मेसेज आला आहे.
धमकीचा हा मेसेज हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत आला आहे. या मसेजमध्ये न्या. मुरलीधर, न्या. मोहम्मद नवाज, न्या. एचटी नरेंद्र प्रसाद, निवृत्त न्या. अशोक जी निजागन्नवर, न्या. एचपी संदेश, न्या. के. नटराजन आणि निवृत्त न्या. बी विरप्पा यांना जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
तसेच ५० लाख रुपयांची खंडणी पाकिस्तानातील बँक खात्यात जमा करावेत असंही मेसेजमध्ये म्हटलं आहे. दुबईस्थित फोन क्रमांकावरुन हा मेसेज आल्याचं सांगितलं जात आहे.
याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये कलम ५०६, कलम ५०७, कलम ५०४ आणि कलम ७५ आणि आयटी कायदा कलम ६६ फ अंतर्गत मेसेज पाठवणाऱ्या या अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.