देश

Hijab Row: 'संविधान हेच भगवद्गीता'; काय म्हणालं कर्नाटक हायकोर्ट?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कर्नाटकातील हिजाब बंदीचे प्रकरण आता चांगलंच तापलेलं दिसून येतंय. हे प्रकरण आता कर्नाटक हायकोर्टामध्ये (Karnataka High Court) गेलं असून त्यावर आता सुनावणी सुरु आहे. या प्रकरणावर बोलताना कर्नाटक हायकोर्टाने म्हटलंय की, आम्ही तर्कानुसार काम करु, कायद्यानुसारच बोलू. या ठिकाणी भावना अथवा लोकभावनेच्या उद्रेकानुसार कामकाज होणार नाही. संविधान (Constitution) काय म्हणतं त्यानुसार आपण कार्यवाही करु. आमच्यासाठी संविधान हीच भगवद्गीता आहे. (Karnataka hijab row)

दुसरीकडे याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे वकील देवदत्त कामत यांनी म्हटलंय की, हेडस्कार्फ अथवा हिजाब परिधान करणे हा मुस्लिम संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. जर काही गुंड हिजाबविरोधात धमकावण्याचा हा प्रकार करत असतील तर या लहान मुलींना तोषिस न पडता कॉलेजपर्यंत नेण्याची जबाबदारी राज्याची ठरते. कामत म्हणाले की काही देश "नकारात्मक धर्मनिरपेक्षता" या संकल्पनेचे पालन करतात.

पुढे ते म्हणाले की, यानुसार ते सार्वजनिकपणे धार्मिक ओळख प्रदर्शित करण्यास परवानगी देत ​​​​नाही. भारतातील धर्मनिरपेक्षता वेगळी आहे, आपण सकारात्मक धर्मनिरपेक्षतेचे पालन करतो. आपली धर्मनिरपेक्षता ही आदरभावनेवर आधारित आहे. राज्याने सर्वच धर्मीयांचा आदर समान पद्धतीने केला जाणे अपेक्षित आहे, या सगळ्या प्रकाराला सार्वजनिक व्यवस्थेचा रंग देणे म्हणजे घोड्यापुढे गाडी लावण्यासारखा प्रकार आहे, असंही देवदत्त कामत यांनी म्हटलंय.

ऍडव्होकेट जनरलनी कर्नाटक हायकोर्टाला म्हटलं की, गणवेश ठरवण्याची स्वायत्तता कॉलेजना देण्यात आली आहे. ज्यांना यातून सुटका हवीये त्यांनी कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीकडे जावं.

दुसरीकडे कर्नाटक हायकोर्टाने म्हटलंय की, शिखांचा विचार करायचा झाल्यास त्यांना Essential Religious Practice (ERP) नुसार फक्त भारतातच नव्हे तर कॅनडा आणि ब्रिटनच्या कोर्टांनी सुद्धा सूट दिली आहे.

तिंरग्याऐवजी फडकावला भगवा

कर्नाटकातील हिजाब बंदीचे प्रकरण आता चांगलंच तापलेलं दिसून येतंय. या पार्श्वभूमीवर आता आणखी एक व्हिडिओ प्रसारित झाला असून यामध्ये एक मुलगा तिरंगा झेडा काढून भगवा झेंडा (saffron flag) फडकावताना दिसून येतो आहे. शिमोगा कॉलेजमधील हा प्रकार असल्याचं कळतंय. (Karnataka hijab ban) या विद्यार्थ्याने कथितरित्या भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा काढून त्या ठिकाणी भगवा ध्वज फडकावला आहे. हा प्रकार घडल्यानंतर खालील विद्यार्थी जल्लोष करतानाही दिसून येतात. तसेच तिथे जमलेले विद्यार्थी हातात भगवे झेंडे आणि गमछा घेऊन आलेलेही स्पष्टपणे दिसतात. सध्या शिमोगा कॉलेजमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. या ठिकाणी आज मंगळवारी सकाळी दगडफेकीचीही घटना घडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT