देश

'तिरंगा काढून भगवा फडकवला नाही'; 3 FIR दाखल केल्याची पोलिसांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कर्नाटकातील हिजाब बंदीचे प्रकरण आता चांगलंच तापलेलं दिसून येतंय. या पार्श्वभूमीवर आता आणखी एक व्हिडिओ प्रसारित झाला असून यामध्ये एक मुलगा भगवा झेंडा (saffron flag) फडकावताना दिसून येतो आहे. शिमोगा कॉलेजमधील हा प्रकार असल्याचं कळतंय. (Karnataka hijab ban)

या विद्यार्थ्याने कथितरित्या भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा काढून त्या ठिकाणी भगवा ध्वज फडकावला आहे. हा प्रकार घडल्यानंतर खालील विद्यार्थी जल्लोष करतानाही दिसून येतात. तसेच तिथे जमलेले विद्यार्थी हातात भगवे झेंडे आणि गमछा घेऊन आलेलेही स्पष्टपणे दिसतात. सध्या शिमोगा कॉलेजमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. या ठिकाणी आज मंगळवारी सकाळी दगडफेकीचीही घटना घडली होती.

याप्रकरणी आता एसपी बीएम लक्ष्मी प्रसाद यांनी म्हटलंय की, राष्ट्रध्वज खाली उतरवून त्याजागी भगवा ध्वज लावण्यात आला होता पण त्या पोलवर राष्ट्रध्वज नव्हता असा अहवाल आला आहे. पोलवर फक्त भगवा ध्वज फडकवला गेला आणि नंतर त्यांनी तो स्वतः काढून घेतला. आज दगडफेकीच्याही घटना दिसून आल्या. आम्ही या प्रकरणी 3 एफआयआर नोंदवले आहेत. त्यापैकी एक एफआयआर शासकीय पदवी महाविद्यालयावर झालेल्या दगडफेकीच्या संदर्भात नोंदवण्यात आला आहेत, ज्यात २ जण जखमी झाले होते, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले की, पोलिस या प्रकरणी अतिशय संयमाने वागले आहेत कारण ही सर्व विद्यार्थ्यांची गर्दी होती. आम्ही संयमानेच वागू मात्र, जर बाहेरील घटक यामध्ये आढळले तर आम्ही कठोर कायदेशीर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.

या संपूर्ण घटनाक्रमाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना कर्नाटका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार (DK Shivakumar ) यांनी म्हटलंय की, कर्नाटकातील काही शिक्षण संस्थेतील परिस्थिती इतकी खराब झालीये आणि हातातून गेलीय की, त्या ठिकाणी तिरंगा काढून भगवा झेंडा फडकावला जातो आहे. मला वाटतंय, सध्या अशा प्रभावाखाली आलेल्या शिक्षणसंस्था आठवडाभरासाठी बंद ठेवल्या पाहिजेत, जेणेकरुन कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित होऊ शकेल. शिक्षण ऑनलाईन सुरु राहिल.

सध्या या हिजाब प्रकरणातील सुनावणीमध्ये कर्नाटक हायकोर्टात (Karnataka High Court) सुनावणी सुरु आहे. त्यातच आता हिजाब घालण्यावरुन (hijab controversy) विद्यार्थी आणि सरकार यांच्यामधील हा तणाव हा वाढतच चालला आहे.

या वादामुळे वेगवेगळ्या गटांनी त्यांच्या धार्मिक पोशाखात येण्याचा प्रयत्न केला. आज मंगळवारी, हायकोर्टाच्या सुनावणीपूर्वी कर्नाटकातील एका महाविद्यालयाबाहेर भगवी शाल आणि हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आंदोलन सुरू झाले. बागलकोटमध्ये दगडफेक झाल्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT