१७ लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपच्या उमेदवारांची नावे जवळपास अंतिम झाली आहेत आणि शेवटच्या क्षणी बदल वगळता जवळपास उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते.
बंगळूर : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) भाजपच्या १७ उमेदवारांची दुसरी यादी अंतिम करण्यात आली आहे. कर्नाटकातील एकाही मतदारसंघासाठी भाजपने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाहीत. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीईसी बैठकीत सर्व २८ मतदारसंघांवर चर्चा झाली.
काही मतदारसंघातील उमेदवार निश्चित झाले असून अधिकृत घोषणा करणे बाकी आहे. या यादीत अनेक इच्छुकांना मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. बेळगाव मतदारसंघात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagadish Shettar) व चिक्कोडीतून रमेश कत्ती (Ramesh Katti) यांची उमेदवारी निश्चित केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
सोमवारच्या सीईसी बैठकीत कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि हरियाणा या राज्यांच्या मतदारसंघांवर चर्चा झाली असून दुसऱ्या यादीत १०० ते १५० मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे. दोन दिवसांत भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती आहे. पहिल्या टप्प्यात भाजपने १९५ मतदारसंघांची नावे जाहीर केली होती.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले की, राज्यातील २८ मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ धजदसाठी सोडले आहेत. त्यांना मंड्या आणि हासन हे मतदारसंघ सोडण्यात आले असल्याचे समजते. तसेच या यादीत अनेक ‘सरप्राईज’ असतील. विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनीही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगितले आहे.
१७ लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपच्या उमेदवारांची नावे जवळपास अंतिम झाली आहेत आणि शेवटच्या क्षणी बदल वगळता जवळपास उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते. शोभा करंदलाजे यांची उडुपी-चिक्कमगळूरऐवजी बंगळूर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हैसूर-कोडगू मतदारसंघातून प्रताप सिम्हा आणि कारवार मतदारसंघातून अनंतकुमार हेगडे हे उमेदवारी गमावण्याची दाट शक्यता आहे.
बेळगाव - जगदीश शेट्टर
चिक्कोडी - रमेश कत्ती
हुबळी धारवाड - प्रल्हाद जोशी
विजापूर - गोविंद कारजोळ
गुलबर्गा - डॉ. उमेश जाधव
हावेरी - बसवराज बोम्मई
शिमोगा - बी. वाय. राघवेंद्र
चित्रदुर्ग - नारायणस्वामी
तुमकूर - व्ही. सोमण्णा
बंगळूर दक्षिण - तेजस्वी सूर्या
बंगळूर मध्य - पी. सी. मोहन
बंगळूर उत्तर - शोभा करंदलाजे
बंगळूर ग्रामीण - डॉ. सी. एन. मंजुनाथ
चिक्कबळ्ळापूर - डॉ. के. सुधाकर
मंगळूर - ब्रिजेश चौटा (एल)
चामराजनगर - डॉ. मोहन कुमार
बळ्ळारी - बी. श्रीरामुलू
म्हैसूर-कोडगू - प्रताप सिम्हा
कारवार - अनंतकुमार हेगडे
दावणगेरे - जी. एम. सिद्धेश्वर
मंगळूर - नलिनकुमार कटील
कोप्पळ - संगण्णा करडी
बळ्ळारी - वाय. देवेंद्रप्पा
विजापूर - रमेश जिगजीणगी
बेळगाव - मंगला अंगडी
बंगळूर उत्तर - डी. व्ही. सदानंद गौडा
बिदर - भगवंत खुबा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.