बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 10 मे रोजी मतदान होणार असल्याची घोषणा केली.
भारतीय निवडणूक आयोगानं (Election Commission of India) बुधवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (Karnataka Assembly Election) तारीख जाहीर केली.
त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाकडून नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. एवढंच नाही तर आज (शुक्रवार) आयोगाच्या भरारी पथकानं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांची गाडी अडवून झडती घेतली.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दोड्डबल्लापूर येथील श्री घाटी सुब्रमण्य मंदिरात जात असताना निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं त्यांच्या कारची झडती घेतली आणि चौकशी केली. मात्र, CM बोम्मईंच्या कारमध्ये पथकाला काहीच सापडलं नाही. राज्यात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळं निवडणूक आयोगाची पथकं जोमानं काम करत आहेत.
याआधी बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 10 मे रोजी मतदान होणार असल्याची घोषणा केली. तर, 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणूक होत आहे. कर्नाटकात सत्ताधारी भाजपकडं 119, काँग्रेसला 75 आणि जेडीएसकडं 28 जागा आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.