JP Nadda Amit Malviya  esakal
देश

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

Karnataka police summons JP Nadda Amit Malviya : कथितरित्या एससी/एसटी समुदायाविरोधात कर्नाटक भाजपने पोस्ट केलेल्या ट्विटच्या संदर्भात कर्नाटक पोलिसांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाचे अमित मालवीय यांना ७ दिवसांच्या आत बंगळुरूच्या हाय ग्राऊंड पीएससमोर बोलावले.

Sandip Kapde

Karnataka police summons JP Nadda Amit Malviya

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांना पक्षाच्या कर्नाटक युनिटने केलेल्या 'आक्षेपार्ह पोस्ट'बद्दल बंगळुरू पोलिसांनी समन्स बजावले आहे. बुधवारी बंगळुरूमधील हाय ग्राउंड्स पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांनी नेत्यांना नोटीस बजावली. जेपी नड्डा आणि अमित मालवीय यांना या व्हिडिओच्या संदर्भात बंगळुरू पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.

कर्नाटकमधील भाजपच्या सोशल मीडिया खात्यावर 4 मे रोजी एक ॲनिमेटेड व्हिडिओ शेअर करण्यात आला होता, त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी नड्डा, मालवीय आणि प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. नड्डा आणि विजयेंद्र यांच्या सूचनेनुसार व्हिडिओ अपलोड केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसनेही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून भाजप नेत्यांवर वेगवेगळ्या धर्मांमध्ये तेढ आणि शत्रुत्व पसरवल्याचा आरोप केला आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे?

भाजपच्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी आणि सिद्धरामय्या ॲनिमेशन स्वरूपात पक्ष्यांच्या घरट्यात मुस्लिम लिहिलेले अंडे ठेवताना दिसत आहेत. त्या घरट्यात अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि मागासवर्गीय (OBC) असे लिहिलेली अंडी आधीच घातली होती. व्हिडिओमध्ये, अंड्यातून टोपी घातलेला पक्षी बाहेर पडतो, त्यावर मुस्लिम लिहिलेले होते, ज्यात राहुल पैसे खाताना दिसत आहे. नंतर तो इतर अंड्यांतून उबवलेल्या पक्ष्यांना घरट्यातून काढून टाकतो.

निवडणूक आयोगाने मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' ला भाजपच्या कर्नाटक युनिटने शेअर केलेला 'ॲनिमेटेड' व्हिडिओ त्वरित हटवण्याचे निर्देश दिले. जो कथितरित्या मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या वादाशी संबंधित आहे. आयोगाने म्हटले आहे की भाजपच्या कर्नाटक युनिटने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केलेला 'ॲनिमेटेड' व्हिडिओ कायदेशीर चौकटीचे उल्लंघन करणारा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : अनिल देशमुख हल्ला प्रकरणाचं AI रिक्रिएशन; विशेष पोलिस महानिरिक्षकांची माहिती

IND vs AUS Viral Video: सर्फराजची कॅचवरून विराट कोहलीने उडवली खिल्ली; ऋषभ पंत तर हसून लोटपोट झाला

Assembly Election 2024 : एसटी बस निवडणूक कर्तव्यावर... प्रवासी स्टॅण्डवर, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचा खोळंबा

Pune Crime : प्रेमसंबंधास नकार; समाज माध्यमावर अश्लील छायाचित्रे टाकून मित्राकडून तरुणीची बदनामी

SCROLL FOR NEXT