Lakshmi Hebbalkar vs Satish Jarkiholi esakal
देश

Karnataka Politics : 'या' दोन बड्या नेत्यांमधला वाद टोकाला; हायकमांड करणार हस्तक्षेप, काँग्रेस सरकार धोक्यात?

लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ज्येष्ठ नेते जारकीहोळी यांना छेडण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवकुमार यांना ७० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगून काही आमदारांनी आगीत इंधन ओतण्याचा प्रयत्न केला.

बंगळूर : राज्याच्या राजकारणात धुमसू लागलेल्या बेळगावातील वादाचे राजकारण शमविण्यासाठी हायकमांडने हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसजनांनी (Congress) केली आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला हा वाद राज्यभर पसरून समस्या निर्माण करण्यापूर्वी जागे व्हायला हवे व जिल्ह्याच्या राजकारणात संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे आवाहन अनेक नेत्यांनी वरिष्ठांकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले.

बेळगावात लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) आणि सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) या मंत्रीद्वयांमध्ये असंतोष वाढला आहे. पीएलडी बँकेच्या निवडणुकीपासून अधिकाऱ्यांच्या बदल्या, विविध कॉर्पोरेट मंडळांच्या नियुक्त्यांसह अनेक चौकशीसाठी परस्पर असहकार सुरू आहे. या दोघांनी संघर्षाच्या राजकारणाला तोंड देत आपले मौन दुर्बलता नाही, असा संदेश दिला आहे.

याला शह देण्यासाठी के. एन. राजण्णा, बसवराज रायरेड्डी, एम. बी. पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आवाज उठवला आहे. उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांनी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याबद्दल पक्षाच्या नेत्यांच्या उघड विधानांना पूर्णविराम देण्याचे आवाहन केले आहे. असे असतानाही मंत्रिपदाचे इच्छुक वारंवार बोलतच आहेत.

दरम्यान, शिवकुमार यांचा बेळगाव दौरा हा मुद्दाम आणि जारकीहोळी बंधूंच्या कुटुंबाला आव्हान देणारा मानला जात आहे. बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात शिवकुमार यांच्या हस्तक्षेपामुळे यापूर्वी धजद-काँग्रेस युतीचे सरकार कोसळले. त्यानंतर चूक सुधारणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक टप्प्यावर निर्णय घेतले. आता परिस्थिती सुधारत असतानाच लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ज्येष्ठ नेते जारकीहोळी यांना छेडण्याचा प्रयत्न केला आहे.

त्याला शिवकुमार यांचा पाठिंबा असल्याचे काही नेत्यांचे मत आहे. शिवकुमार जिल्ह्याच्या भेटीवर आले असता जिल्ह्यातील आमदार त्यांच्यापासून दूर राहिले. त्यामुळे शंकांना जागा निर्माण झाली आहे; मात्र सर्व आमदार दसरा उत्सवात होते आणि प्रदेशाध्यक्षांचा दौरा अचानक ठरल्याने कोणीही त्यांचे स्वागत करण्यासाठी गेले नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त करणारे सतीश जारकीहोळी यांनी पक्षात खूप फेरबदल होणार असल्याचे सांगितले.

याला उत्तर देताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपले मौन हा कमजोरपणा नसल्याचा पलटवार केला आहे. खरे तर शिवकुमार यांचा बेळगावातील कार्यक्रम १५ दिवसांपूर्वीच ठरला होता. हेब्बाळकर यांच्याशी वाद वाढल्याने सतीश जारकीहोळी यांनी शिवकुमार यांनी जिल्ह्याचा दौरा करू नये, असा संदेश पाठवला होता, असे सांगण्यात येते. सतीश जारकीहोळी यांनी स्थानिक आमदार शिवकुमार यांच्या भेटीपासून दूर राहतील याची खात्री करून घेतल्याचे सांगितले जाते.

मात्र, शिवकुमार यांना ७० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगून काही आमदारांनी आगीत इंधन ओतण्याचा प्रयत्न केला. बेळगावातील हा राजकीय संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून, तो शमवण्यासाठी हायकमांडचा हस्तक्षेप आवश्यक असल्याची मते ऐकायला मिळत आहेत. दरम्यान, या संघर्षात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मात्र सोयीस्कर मौन पाळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT