Former Chief Minister Jagadish Shettar esakal
देश

'भाजपमध्ये परतण्यासाठी माझ्यावर दबाव, पण मी माघारी फिरणार नाही'; माजी मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

राम मंदिराचा मुद्दा राजकीय बनू नये. राजकारणात धर्म असला पाहिजे, धर्मात राजकारण नाही.

सकाळ डिजिटल टीम

मी भाजपचे माजी आमदार शंकर पाटील यांच्यासह कोणत्याही नेत्यावर जबरदस्तीने काँग्रेसमध्ये (Congress) जाण्यासाठी दबाव आणत नाही.

बंगळूर : भाजपमध्ये (BJP) परतण्यासाठी माझ्यावर दबाव आहे; पण अपमानित होऊन मी तिथून बाहेर पडलो आहे. आता माघारी परतण्याची परिस्थिती नसल्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagadish Shettar) यांनी स्पष्ट केले.

जगदीश शेट्टर यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांनी पक्ष सोडल्यानंतर अडचणी निर्माण झाल्याची भावना पक्षाचे कार्यकर्ते, नेते आणि माजी आमदारांमध्ये आहे. त्यासाठी मी स्वगृही परतावे, असे त्यांनी अनेक प्रसंगी सांगितले आहे. मात्र, प्रभावशाली नेत्यांनी अद्याप माझ्याशी संपर्क साधलेला नाही. त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शेट्टर यांनी स्पष्ट केले.

मी भाजपचे माजी आमदार शंकर पाटील यांच्यासह कोणत्याही नेत्यावर जबरदस्तीने काँग्रेसमध्ये (Congress) जाण्यासाठी दबाव आणत नाही. रामण्णा लमाणी आदींनी तुम्ही जिथे असाल, तिथे आम्ही असू, असे सांगितले आहे. त्यांना आपण काँग्रेस नेत्यांकडे नेऊन त्यांची भेट घेतल्याचेही ते म्हणाले.

राम मंदिराचा मुद्दा राजकीय बनू नये. राजकारणात धर्म असला पाहिजे, धर्मात राजकारण नाही. अयोध्येत राममंदिर व्हावे, ही सर्वांची इच्छा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदिर होत आहे. ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. राममंदिर गर्भगृहाच्या स्थापनेसाठी त्यांनी काही निवडक लोकांना आमंत्रित केले आहे. एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना येथे निमंत्रित करण्यात आलेले नाही, असा भेदभाव का, राममंदिरात कुणीही जाऊ शकतो. त्यात राजकारण का, असा सवाल त्यांनी केला. २२ जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपने दिले नसून श्री राम मंदिर ट्रस्टने दिले होते. कोणाला आमंत्रण द्यायचे आणि कोणाला न द्यायचे हे ट्रस्टने ठरवायचे आहे. काँग्रेस नेत्यांनी या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, बहिष्कार घालणार असल्याचे त्यांनी सांगितले नाही. याशिवाय काँग्रेसमधील कोणीही जाऊ नका, असे सांगितले नाही. मला निमंत्रण पत्रही मिळाले आहे, पण मी जाणार नाही, असे ते म्हणाले.

राममंदिराची स्थापना लोकसभेसाठी?

भाजपच्या टीकेचे राजकारण स्पष्टपणे दिसून येत नाही. लोकसभा निवडणुकीचा आधार राम मंदिराची स्थापना आहे का किंवा काँग्रेस पक्षावर टीका करण्यासाठी राम मंदिर बांधले जात आहे का, असा सवाल त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीसाठी आणि काँग्रेस पक्ष हिंदूद्रोही असल्याची टीका करण्यासाठी राममंदिर उभारले जात असल्याची शंका उपस्थित होऊ लागली आहे, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT