Karnataka Politics esakal
देश

काँग्रेस सरकार धोक्यात? गृहमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला उपमुख्यमंत्र्यांची दांडी; मुख्यमंत्र्यांच्या हजेरीने राजकीय चर्चांना उधाण

शिवकुमार यांचे घर परमेश्वर यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असूनही त्यांना स्नेहभोजनाला बोलावले नाही.

सकाळ डिजिटल टीम

अनुसूचित जातीतील परमेश्वर आणि जमातीतील सतीश जारकीहोळी यांचा उपमुख्यमंत्रिपदावर डोळा आहे.

बंगळूर : उपमुख्यमंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्या अनेक मंत्र्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्यासोबत गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर (G. Parameshwara) यांच्या घरी स्नेहभोजन कार्यक्रम झाला. विशेषत: उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना दूर ठेवल्याने या बैठकीविषयी उत्सुकता वाढली आहे.

या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) आणि समाजकल्याण मंत्री एच. सी. महादेवप्पा सहभागी झाले होते. दरम्यान, मंड्या मतदारसंघाचे आमदार रवी गनिगा यांनी शुक्रवारीच शिवकुमार (DK Shivakumar) मुख्यमंत्री होणार असल्याचे विधान केले होते. मात्र ही केवळ सौजन्यपूर्ण भेट आहे. मी, मुख्यमंत्री, महादेवप्पा, सतीश जारकीहोळी स्नेहभोजनात सामील झालो. त्यात कोणतेही राजकारण नाही, असे परमेश्वर यांनी स्प्ष्ट केले.

सतीश जारकीहोळी म्हणाले, ‘‘पण सध्यातरी गांभीर्याने घेण्यासारखे काही नाही.’’ शिवकुमार यांचे घर परमेश्वर यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असूनही त्यांना स्नेहभोजनाला बोलावले नाही, याबद्दल शंका व्यक्त झाल्या. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या गुप्त बैठकीत सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात शिवकुमार यांच्या हस्तक्षेपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

या बैठकीत महामंडळाची नियुक्ती, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड, बेळगाव जिल्ह्याचे राजकारण, सत्तावाटपाचा फॉर्म्युला, मुख्यमंत्री, मंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदांबाबत आमदारांनी केलेली वक्तव्ये, याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

सिद्धरामय्या यांचे फासे :

सिद्धरामय्या यांनी दलित समाजातील प्रमुख नेत्यांशी घेतलेल्या भेटीमुळे वेगवेगळी गणिते रंगली आहेत. यापूर्वी सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी राज्यात जातिनिहाय प्रतिनिधित्वानुसार उपमुख्यमंत्र्यांची तीन पदे निर्माण करावीत, असे सांगितले. ज्येष्ठ आमदार बसवराज रायरेड्डी म्हणाले होते की, अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक, लिंगायत आणि महिलांसह पाच जण उपमुख्यमंत्री असावेत.

अनुसूचित जातीतील परमेश्वर आणि जमातीतील सतीश जारकीहोळी यांचा उपमुख्यमंत्रिपदावर डोळा आहे. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची संधी गमावली. परंतु त्यांना विधान परिषदेवर उमेदवारी दिली. पक्षाचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांना मंत्रिपदही मिळाले. तसेच मंत्री के. एच. मुनियप्पा आणि एच. अंजनेय यांनीही मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. मुनियप्पा आणि अंजनेय यांची ओळख सिद्धरामय्या यांच्या निकटवर्तीय अशी आहे.

केपीसीसीचे अध्यक्ष म्हणून प्रदीर्घ काळ काम केलेल्या परमेश्वर यांची ओळख सिद्धरामय्या यांचे प्रतिस्पर्धी अशी होती. धजद-काँग्रेस आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या परमेश्वर यांना काँग्रेस सरकारमध्येही उपमुख्यमंत्री पदाची अपेक्षा होती, परंतु हायकमांडने त्यांना परवानगी दिली नाही. शिवकुमार यांनाच महत्त्वाचे पद मिळाल्याने त्यांनी असंतोष व्यक्त केला.

सत्तावाटपाचा फॉर्म्युला आताच तयार

सिद्धरामय्या लोकप्रिय आहेत. तसेच त्यांना अधिक आमदारांचा पाठिंबा आहे, असा अर्थ लावला जात आहे. पण अडीच वर्षांनंतरचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला आताच तयार आहे. काही आमदार शिवकुमार मुख्यमंत्री होतील, असे सांगत आहेत. त्याबरोबरच पुन्हा दलित, लिंगायत आणि अल्पसंख्याकातून मुख्यमंत्रिपदाची मागणी होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT