बेंगळुरू- कर्नाटकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ईडीच्या दोन अधिकाऱ्यांवर कर्नाटकमधील सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि अर्थमंत्र्यांचे १८७ कोटींच्या वाल्मिकी कॉर्पोरेशन घोटाळ्याप्रकरणात नाव घेण्यासाठी दबाव टाकल्याच्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर आरोप आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी वाल्मिकी कॉर्पोरेशन प्रकरणात मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांचे नाव घ्यावे यासाठी सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला असा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी मुरली कन्नन आणि मित्तल यांच्याविरोधात समाज कल्याण विभागाचे अतिरिक्त संचालक कल्लेश बी यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर विल्डस गार्डनर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये कल्लेश म्हणाले आहेत की, 'कन्नन यांनी मला १६ जुलै रोजी १७ प्रश्न विचारले. त्यांना मी योग्य उत्तर दिले. पण, त्यांनी मला अर्थमंत्र्यांचे नाव घेण्यासाठी दबाब टाकला. याशिवाय मल्लेश यांनी मला धमकी दिली. ते म्हणाले, तुम्हाला वाटत असेल ईडीने तुम्हाला मदत करावी तर मुख्यमंत्री आणि अर्थ विभागाचे नाव घ्या.
तुम्हाला जर सक्तवसुली संचालनालयाकडून पाठिंबा हवा असेल तर तुम्ही लिखितमध्ये द्या की, एमजी रोड यूनियन बँकेतील पैसे मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि नागेंद्रा यांच्या आदेशाने त्यांच्या खात्यात वळवण्यात आले. पैसे वळते करण्यासाठी खूप दबाव टाकला जात होता असं सांगा, असं मित्तल यांनी म्हटल्याचा दावा कल्लेश यांनी केला आहे.
तक्रारीत असं म्हणण्यात आलंय की, कल्लेश हे कोणत्याही गुन्ह्यात सहभागी नव्हते तरी त्यांना समन्स पाठवण्यात आला अन् धमकी देण्यात आली. दरम्यान, वाल्मिकी कॉर्पोरेशन प्रकरणात तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. पण, याच प्रकरणात ईडी आणि सीबीआय स्वतंत्रपणे तपास करत आहे. याआधी ईडीने माजी मंत्री बी नागेंद्रा यांच्या ठिकाणांवर छापा टाकला होता. नागेंद्रा सध्या कोठडीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.