Karni Sena Nagar Mantri Rohit Rajput Murder esakal
देश

Karni Sena : करणी सेनेच्या नगर मंत्र्याची चाकूने भोसकून हत्या; 3 आरोपींना अटक

एका व्यक्तीनं या हत्याकांडाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

एका व्यक्तीनं या हत्याकांडाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला आहे.

नर्मदापुरम : नर्मदापुरमच्या (Narmadapuram) इटारसीमध्ये शुक्रवारी रात्री हल्लेखोरांनी करणी सेनेच्या (Karni Sena) शहर मंत्र्याची हत्या केल्यानं खळबळ उडाली. सूरजगंज रोडवर 3 हल्लेखोरांनी मिळून रोहित सिंह राजपूत (28) आणि त्याचा मित्र सचिन पटेल यांच्यावर चाकूनं हल्ला केला. आश्‍चर्याची बाब म्हणजे, ज्या वेळी ही हत्या झाली, त्या वेळी लोक मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित होते. त्यापैकी कोणीही हस्तक्षेप केला नाही.

एका व्यक्तीनं या हत्याकांडाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केलाय. माहिती मिळताच पोलिसांनी (Itarsi Police Station) घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीला अटक केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री 8.15 च्या सुमारास घडली. रोहित त्याच्या मित्रासोबत मुख्य बाजारपेठेत गप्पा मारत बसला होता. दरम्यान, दुचाकीवरून तीन मुलं तिथं पोहोचली आणि त्यांनी दोघांशी वाद घालण्यास सुरुवात केली.

अचानक त्यांच्यात वाद झाला आणि एका बदमाशानं चाकू काढून रोहितच्या पोटात वार केला. आरोपी त्यांच्यावर सतत हल्ले करत होते. हे पाहून त्याचा मित्र त्याला वाचवायला आला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावरही सपासप वार केले. तिथं उभ्या असलेल्या लोकांनी तत्काळ पोलिसांना ही माहिती दिली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं. तिथं उपचारादरम्यान रोहितचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर आहे. दरम्यान, इटारसी पोलिस स्टेशनचे टीआय आरएस चौहान यांनी सांगितलं की, करणी सेनेचे शहर मंत्री रोहित सिंह राजपूत यांच्या हत्येमागं जुना वाद आहे. हत्येतील मुख्य आरोपी फूलसिंग ठाकूर (वय 27) हा उत्तर बंगला इटारसी येथील रहिवासी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT