Kashmir  Sakal
देश

काश्मीर एकटा नाही! एकतेचा संदेश देत भारतीय लष्कराने शेअर केला भावनिक व्हिडिओ

पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला अंत्ययात्रा आणि एक रडणारे मूल दाखवण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir ) सुरक्षा दल सातत्याने दहशतवाद्यांचा (Terrorist) खात्मा करत आहे. दरम्यान, श्रीनगरस्थित भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने (Chinar Corps ) शुक्रवारी त्यांच्या ट्विटर हँडलवर 'काश्मीर फाईट्स बॅक' या शीर्षकासह एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ 1 मिनिट 18 सेकंदाचा आहे. (Chinar Corps Of Indian Army Share Emotional Video)

पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये काश्मीरमधील नागरिक कोणत्याही धर्माचा असो, त्यांच्यावर दहशतवादाचा कसा परिणाम झाला आहे हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच नागरिकांच्या व्यथा यात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचवेळी, खोऱ्यातील स्थैर्यासाठी त्यांच्या लढ्यात लष्कर त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही देण्यात आली आहे. (Chinar Corps Video On Social Media )

व्हिडिओमध्ये नेमकं काय?

पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला अंत्ययात्रा आणि एक रडणारे मूल दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायनाची दृश्ये आणि दगडफेकीच्या घटनादेखील दाखवण्यात आल्या असून, दहशतवाद्यांनी खोऱ्यातील तरुणांची कशी दिशाभूल केली आहे हेही यामध्ये सांगण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये पत्रकार शुजात बुखारी, सामाजिक कार्यकर्ते अर्जुमंद मजीद, माखन लाल बिंदू, सुपिंदर कौर, अजय पंडिता, लेफ्टनंट उमर फयाज, अयुब पंडिता आणि परवेझ अहमद दार यांच्यासह दहशतवाद्यांनी मारलेल्या काश्मिरींना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. तसेच दहशतवाद्यांनी गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काश्मीर बोलत राहिला असा संदेश देण्यात आला आहे.

‘झेलम रोया फॉर काश्मीर’

व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘झेलम रोया फॉर काश्मीर’ हे गाणे लावण्यात आले असून, सुरक्षा दलाचे जवान नागरिक आणि लहान मुलांना दिलासा देताना दाखवण्यात आले आहे. तर, या लढाईत काश्मीर एकटाच नसून, आम्ही मिळून ही लढाई जिंकू असा संदेश देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जीगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT