जम्मू : जम्मू काश्मिरमधील बडगाम जिल्ह्यात गुरुवारी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. दरम्यान आज एका पोलिस कॉन्स्टेबलची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्याही घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
(Jammu Kashmir Second Killing In Second Day)
काल बडगाम जिल्ह्यातील तहसील कार्यालयात काम करणारे राहुल भट्ट यांच्यावर सरकारी कार्यालयात घुसून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या हत्येच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सलग दुसरी हत्या दहशवाद्यांकडून करण्यात आली आहे. रियाद अहमद ठोकेर असं या पोलिस कॉन्स्टेबलचं नाव असून पुलवामा जिल्ह्यातील गुडरू येथील ते रहिवाशी होते. अज्ञात दहशतवादी ठोकेर यांच्या घरात घुसले होते. त्यांनी त्यांच्या छाती आणि डोक्यात गोळ्या झाडल्या आणि फरार झाले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी त्या भागात घेराव घातला असून दहशतवाद्यांचा तपास सुरू करण्यात आला आहे. काल बडगाम जिल्ह्यातील चडूरा शहरात तहसील कार्यालयात घुसून राहुल भट्ट या पंडिताची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान तहसील कार्यालयात १०० पेक्षा जास्त कर्मचारी होते पण फक्त राहुल भट्ट यांनाच गोळी कशी मारली असा प्रश्न उपस्थित केला असून चौकशीची मागणी केली आहे.
काश्मीरमधील वारंवार होत असलेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याअगोदर घाटी परिसरातील एका सरपंचाचा खून करण्यात आला होता. त्यानंतर बडगाम जिल्ह्यातील पंडितांनी काश्मीर सोडा नाहीतर मरायला तयार राहा अशा आशयाचे पत्र आले होते. त्यानंतर काल आणि आज सलग दोन दिवस दोन हत्या दहशतवाद्यांकडून करण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.