Kedarnath  sakal
देश

Kedarnath : काँग्रेसकडून केदारनाथ बचाव यात्रेची सुरुवात;दिल्ली येथील प्रतिकृतीला विरोध

राजधानी दिल्ली येथे केदारनाथ मंदिराची प्रतिकृती निर्माण केली जाणार असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या उत्तराखंडमधील नेत्यांनी बुधवारी केदारनाथ बचाओ यात्रेचे आयोजन केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

डेहराडून : राजधानी दिल्ली येथे केदारनाथ मंदिराची प्रतिकृती निर्माण केली जाणार असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या उत्तराखंडमधील नेत्यांनी बुधवारी केदारनाथ बचाओ यात्रेचे आयोजन केले आहे.

हरिद्वार येथील ‘हर की पौडी’येथे पूजा आणि यज्ञविधीचे आयोजन करून या यात्रेची सुरूवात केली. उत्तराखंडचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करण महारा आणि प्रदेश उपाध्यक्ष मथुरादत्त जोशी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

१६ दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत हे देखील या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. याआधी केदारनाथ मंदिरातील पुजाऱ्यांनीदेखील दिल्लीत निर्माण होत असलेल्या मंदिराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

‘चारधाम’चे पावित्र्य जाईल

‘‘चारधाम यात्रा ही आपल्या धार्मिक परंपरांचे प्रतीक असून त्यांच्या पावित्र्याला धक्का लागेल अशा कोणत्याही गोष्टीला आम्ही विरोध करू,’’ असे मत हरिश रावत यांनी व्यक्त केले आहेत. दिल्लीत बांधण्यात येणाऱ्या मंदिरामुळे चारधाम यात्रेचे पावित्र्य जाण्याची भीती काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

या मंदिराचे नाव केदारनाथ मंदिर असेच ठेवण्यात येणार असून त्या नावे देणगी स्वीकारण्यात येणार असल्यानेही अनेकांनी त्यावर आक्षेप नोंदविला आहे. त्याचप्रमाणे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धानी हे दिल्लीत बांधण्यात येणाऱ्या मंदिराच्या भूमीपूजन समारंभाला उपस्थित राहिल्याबद्दल काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashinath Date: पारनेरमध्ये लंकेंच्या गडाला सुरुंग लावणारे काशिनाथ दाते कोण? काय होती रणनीती?

Latest Marathi News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल

Weight Gain Problem : मुलांपासून प्रौढांमध्ये लठ्ठपणामुळे वाढती समस्या, आरोग्यावरील गंभीर परिणाम आणि उपाय...जाणून घ्या

Ahilyanagar Crime : पाळीव 'पोपट' मारला; तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, तीन महिन्याच्या शिक्षेसह 500 रूपये दंड

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT