Kedarnath Temple Door Open ANI
देश

केदारनाथचे दरवाजे उघडले, २ वर्षानंतर भाविकांना घेता येणार दर्शन

सकाळ डिजिटल टीम

उत्तराखंड : चार धाम यात्रा (Char Dham Yatra) ३ मे रोजी सुरू झाली आहे. त्यासाठी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर गंगोत्री धाम आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचे (Kedarnath Temple Opened) आज शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दरवाजे उघडण्यात आले. कोरोनाच्या दोन वर्षानंतर हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. यावेळी हजारो भाविकांसह उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी देखील उपस्थित होते.

केदारनाथ मंदिर हे उत्तराखंडमधील चार धाम आणि पंच केदार यांचा एक भाग आहे आणि भारतातील भगवान शिव यांच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. इथं चार धाम यात्रेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पण, कोरोनामुळे भाविकांना प्रवेश दिला जात नव्हता. अखेर आजपासून सर्वसामान्य भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे. पण, उत्तराखंड सरकारने कोरोनामुळे चार धाम यात्रा २०२२ साठी यात्रेकरूंच्या संख्येची दैनिक मर्यादा निश्चित केली आहे. केदारनाथ मंदिरासाठी दैनिक मर्यादा 12,000 आणि बद्रीनाथसाठी 15,000, तर गंगोत्री धामसाठी दैनंदिन मर्यादा 47000 आणि यमुनोत्री धाम 4,000 ठेवण्यात आली आहे. कोरोनामुळे भाविकांची संख्या ठरवून दिली असली तरी चारधाम यात्रेसाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र किंवा कोरोना लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य नाही, असंही धामी सरकारकडून सांगण्यात आलं आहे. बाबा केदारनाथचे दरवाजे उघडल्यानंतर आजपासून भाविकांना मोक्ष आणि मनोकामना पूर्ण होताना पाहता येणार आहेत, असे आचार्य शैलेश तिवारी म्हणाले.

पूजा, आरती, प्रसादासाठी नोंदणी -

केदारनाथ मंदिरात जाणाऱ्या यात्रेकरूला पूजा, आरती आणि प्रसाद ठेवायचा असेल तर त्यासाठी आधी नोंदणी करावी लागले, असे श्री बदरीनाथ केदारनाथ मंदिर समितीने म्हटले आहे. नोंदणीसाठी, अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि मोबाईल क्रमांक, नाव, लिंग आणि मेल आयडी टाकून नोंदणी करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

Railway News: पश्चिम रेल्वेला लागले सुरक्षेचे ‘कवच’, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी जावेद अख्तर यांना दिलासा

Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

Trending : 10 वर्ष,47 वेळा केली चोरी; न्यायालयाने दिली अशी शिक्षा की पूर्ण करायला घ्यावे लागतील 4 जन्म

SCROLL FOR NEXT