Kedarnath : २०१३ मधली ती घटना होती. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हादरवणारी ती घटना होती. टेलिव्हिजनवर दाखवण्यात येणार लाईव्ह फुटेज अंगाला शहारे सोडणारं होतं. वादळ वाऱ्याचा पाऊस आणि चौफेर मृत्यूचं तांडव असं ते भयावह दृष्य होतं.
१६ जूनचा तो दिवस केदारनाथांच्या प्रकोपाचा दिवस होता जणू. केदारनाथला दरवर्षी लाखो भक्त दर्शनासाठी जातात. त्या भयानक घटनेची आजही आठवण झाल्यास अंगावर शहारे आणि डोळ्यासमोर तो मृत्यूचा तांडव ओढवतो. आता प्रश्न उपस्थित होतो तो, केदारमध्ये का होते वारंवार ढगफुटी?
ढगफुटी का होते याचे कारण आज आपण जाणून घेऊया?
ढगफुटी म्हणजे अचानक आणि मुसळधार पाऊस जो अचानक येतो. 20 ते 30 चौरस किमी क्षेत्रामध्ये 100 मिमी किंवा 10 सेमी प्रति तास पेक्षा जास्त पाऊस या श्रेणीत येतो. ढगफुटीची व्याख्या भू-जलविज्ञानीय धोका म्हणून केली जाते.
निसर्गातील आक्रमकता आणि पावसाच्या विनाशाचे प्रमाण कधीकधी भीतीदायक असते. भारतात जून महिन्यापासून नैऋत्य मॉन्सूनच्या काळात ढगफुटी होते. ढगफुटीचा अंदाज लावणे कठीण आहे कारण ते अचानक आपत्तीजनक शक्तीसह उद्भवते आणि त्यामुळे पावसाच्या पूरात मोठं नुकसान होते. अशीच घटना २०१३ साली केदारनाथमध्ये घडली होती.
ढगफुटी म्हणजे कमी कालावधीत तीव्र पाऊस पडणे ज्यात अंदाजे 20-30 चौरस कि.मी. च्या भौगोलिक प्रदेशात 100 मिमी / तासापेक्षा जास्त अनपेक्षित पाऊस पडतो. भारतीय उपखंडात सर्वसाधारणपणे असे घडते की, जेव्हा मान्सूनचा ढग उत्तरेकडे वाहतात, बंगालच्या उपसागरातून किंवा अरबी समुद्राकडून मैदानी प्रदेशओलांडून पुढे हिमालयाकडे जातो आणि कधीकधी ताशी ७५ मिलिमीटर पाऊस पडतो.
हवामान बदलामुळे जगभरातील अनेक शहरांमध्ये ढगफुटीची वारंवारता आणि तीव्रता वाढेल, असे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे.
मे 2021 मध्ये, जागतिक हवामान संघटनेने असे नमूद केले आहे की, वार्षिक सरासरी जागतिक तापमान पुढील पाच वर्षांपैकी कमीतकमी एका वर्षात औद्योगिक पातळीपेक्षा तात्पुरते 1.5 डिग्री सेल्सियस वर पोहोचण्याची शक्यता सुमारे 40% आहे.
2021 ते 2025 मधील किमान एक वर्ष विक्रमी सर्वात उष्ण ठरण्याची आणि 2016 चा रेकॉर्ड मोडण्याची 90% शक्यता आहे. (Badrinath-Kedarnath)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.