Kanyakumari Sakal
देश

केरळला ‘तौत्के’ वादळा चा तडाखा; जनजीवन पूर्णपणे ठप्प

कोकणात रत्नागिरीमध्ये पावसाला सुरुवात झाली असून समुद्रामध्ये उंच लाटा उसळू लागल्या आहेत. किनारी भागांतील अनेक गावांमधील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली/ मुंबई - महाराष्ट्रासह (Maharashtra) चार राज्यांवर ‘तौत्के’ या चक्रीवादळाचे (Tauktae Storm) संकट (Disaster) घोंघावू लागले आहे. कोकणात (Konkan) रत्नागिरीमध्ये आज सायंकाळी पावसाला (Rain) सुरुवात झाली असून देवभूमी केरळलाही (Kerala) वादळी वाऱ्यासह पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. केरळमध्ये अनेक ठिकाणांवर विजेचे खांब आणि झाडे रस्त्यांवर उन्मळून पडल्याने जनजीवन (Public Life) पूर्णपणे ठप्प झाले आहे. या वादळाचा रोख हा गुजरात, दमण-दिवू आणि दादरा- नगर हवेलीच्या दिशेने असला तरीसुद्धा कोकण आणि किनारी भागांमध्ये त्याचा प्रभाव दिसू लागला आहे. (Kerala hit by Tauktae storm Public Life Completely Stalled)

कोकणात रत्नागिरीमध्ये पावसाला सुरुवात झाली असून समुद्रामध्ये उंच लाटा उसळू लागल्या आहेत. किनारी भागांतील अनेक गावांमधील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. आज रात्री उशिरापर्यंत हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता असून त्यामुळे मुंबई आणि ठाण्यामध्ये उद्या (ता.१६) रोजी मुसळधार पाऊस कोसळू शकतो अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या वादळाचा थेट फटका मुंबईला बसण्याची शक्यता तशी कमीच आहे.

पाच तालुक्यांत लॉकडाउन

रत्नागिरी - या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील पाच तालुक्यांत रविवारी (ता. १६) सकाळपासून सोमवारी (ता. १७) पहाटेपर्यंत कडक लॉकडाउन करण्यात येणार असून या काळामध्ये अत्यावश्‍यक सेवाही बंद राहतील. चक्रीवादळामुळे ताशी ९० किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे झाडे व घरांची पडझड होण्याची शक्‍यता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी व्यक्त केली. या वादळामुळे फत्तेगढ आणि पाजपांढरी येथून नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. समुद्रामध्ये गेलेल्या मच्छीमारांच्या नौकांनी देखील आता बंदरांचा आश्रय घ्यायला सुरुवात केली आहे.

मदत, बचाव कार्याला वेग

या अस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मदत आणि बचाव कार्याला वेग आला आहे. केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि गुजरात या राज्यांनी युद्धपातळीवर उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. केरळमध्ये या वादळाचा प्रभाव दिसू लागला असून मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगौड या जिल्ह्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. अलप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, एर्नाकुलम, थ्रिसूर, पलक्कड या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली आहे.

देवभूमीतून

  • नद्यांची पाणीपातळी वाढल्याने

  • लोकांना सुरक्षितस्थळी हलविले

  • झाडे कोसळून पडल्याने वाहतूक ठप्प

  • अनेक धरणांतून विसर्गाला सुरुवात

  • एनडीआरएफकडून मदत, बचाव कार्याला वेग

  • वालियाथुरा येथील पुलाला पावसामुळे तडे

  • किनारी भागांतील लोक छावण्यांत आश्रयाला

गृहमंत्रालयाचेही लक्ष

या वादळी संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेतला. खुद्द केंद्रीय सचिव हे राज्ये, विविध केंद्रीय मंत्रालये आणि संबंधित यंत्रणांच्या संपर्कामध्ये राहतील. केंद्रीय गृह मंत्रालय देखील विविध राज्यांकडून चोवीस तास तयारीचा आढावा घेत असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली.

वादळी घडामोडी

  • मुख्यमंत्री ठाकरेंकडून उपाययोजनांचा आढावा

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सज्जतेचा आढावा

  • एनडीआरएफची ५३ पथके विविध राज्यांत

  • महाराष्ट्रात किनारी जिल्ह्यांमध्ये हायअलर्ट

  • मच्छीमारांच्या बोटी देवगड बंदरात आश्रयाला

  • पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला धोका

  • वांद्रे-वरळी सी लिंक दोन दिवसांसाठी बंद

  • गुजरातमधील ५६ रेल्वे गाड्या अखेर रद्द

असा प्रवास होणार

‘तौत्के’ कोकण किनारपट्टीला समांतर पुढे गुजरातकडे रवाना होईल. रविवारी सकाळी वेंगुर्ले किनाऱ्याजवळून याचा प्रवास सुरू होईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान राजापूर, आंबोळगड, सागवे, साखरीनाटे या परिसरातून ते प्रवेश करेल. दुपारी १ वाजेपर्यंत पूर्णगडला, पुढे सायंकाळी ४ वाजता रत्नागिरी शहरापर्यंत येईल. सायंकाळी ६ नंतर ते मालगुंड, नेवरे, जयगड, रात्री ११ वाजता गुहागर किनाऱ्यावरून दापोलीकडे जाईल. सोमवारी (ता. १७) पहाटे ४ ते ५ या कालावधीत ते दापोली, मंडणगडच्या किनाऱ्यावरून पुढे रवाना होण्याचा अंदाज विंडी या वेबसाइटने वर्तविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT